हटके

तिला वाटले नवऱ्याचे अफेयर पण सत्य ऐकून बसला धक्का

Spread the love

 नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

 एस्मा रुस्को आणि तिचा पती सायमन रुस्को यांचे वैवाहिक जीवन सामान्य नवरा बायको प्रमाणे होते. त्यांच्या संसार वेलीवर 2 फुले देखील उमळली होती. सगळे व्यवस्थित सुरू असताना पण जेव्हा ते ग्रीसमध्ये सुट्टीवर गेले होते तेव्हा सायमन शांत शांत बसू लागला. त्याला कोणासोबत मिसळायला आवडत नसे. तो त्याच्या मित्रांसोबतही बाहेर जात नसे. पत्नीला असं वाटलं की त्याचं कुठे बाहेर अफेअर चालू आहे. त्यामुळे ती त्याच्यावर लक्ष ठेवू लागली. ती जेव्हा त्याला डॉक्टर कडे गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.

55 वर्षांची एम्मा म्हणाली की, 2015 साली ग्रीसमध्ये सुट्टीवर असताना तिला आपल्या 58 वर्षीय पतीच्या वागण्यात थोडा बदल झाल्याचं जाणवलं. तो खूप एकटा एकटा राहू लागला आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडू लागला. अशा स्थितीत पतीचं कुठेतरी अफेअर असल्याचा एम्माला संशय आला. 2016 पर्यंत तो रस्ते विसरायला लागला होता.

तो काय बोलला हे त्याच्या लक्षात रहायचं नाही. हे जास्त वाढू लागल्यावर त्रास वाढल्यावर एम्मा त्याला मेमरी क्लिनिकमध्ये घेऊन गेली. 2 वर्षांपासून तो त्याच्या भेटी विसरून जायचा आणि 2018 मध्ये डॉक्टरांनी सांगितलं की तणावामुळे असं झालं आहे.

2020 मध्ये, एका डॉक्टरांनी सांगितलं की त्याला विसरण्याचा आजार होऊ लागलाय. एम्मा साठी हा धक्का होता कारण ती लहानपणापासून सिमोनसोबत होती आणि तिच्या लग्नाला 31 वर्षे झाले होते. दरम्यान, अशा अनेक घटना समोर येत असतात की ज्यामध्ये लोक छोट्या गोष्टींमुळे किंवा त्यांच्या वेगळ्या वागण्यामुळे एकमेकांवर संशय घेतो त्यांना चुकीचं ठरवतो. मात्र नंतर वेगळंच सत्य समोर येतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close