येरंडगाव येथिल रमेश ताटेवार यांच्या सुकन्यांचे TAIT परीक्षेत घवघवीत सुयश
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार.
घाटंंजी:- महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय एरंडगाव येथील शिक्षक रमेश ताटेवार यांच्या कु. कांचन व उन्नती या दोन्ही मुलींनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा घेण्यात आलेल्या टेट परीक्षेत कु. कांचन रमेश ताटेवार व उन्नती रमेश ताटेवार यांनी भ. ज. ब. (NT-B) प्रवर्गामधून महाराष्ट्र राज्यातून अनुक्रमे रँक १३ व रँक १६९ प्राप्त करून यश संपादन केले. उच्च काठिण्य पातळी असलेल्या या परीक्षेत जिद्द , चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर अपेक्षित यश संपादन करता आले असे १४२ गुण प्राप्त करणाऱ्या कांचन ने यावेळी सांगितले.कांचन M.Sc. (math) द्वितीय वर्षाला असून उन्नती ने M.Sc. (chemistry) पर्यंत शिक्षण घेतले आहे.उन्नती ही जी.एस. कॉलेज खामगाव जि. बुलढाणा येथील गणित विषयाचे व्याख्याता (lecturer) पद्माकर दिलीपराव कायपेल्लीवार यांची सुविध्य पत्नी आहे. बी. एड. नंतर दोघींनी शिक्षिका होण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रचंड मेहनत घेतली व समाजात एक आदर्श निर्माण केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील तथा मार्गदर्शक शिक्षकांना दिले. दोन्ही बहिणींनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर यशाबद्दल दोनही मुलींचे अभिनंदन लोकायत मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर भगत, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. वेले, व सर्व शिक्षक कर्मचारी वृंदायांचे कडून अभिनंदन करण्यात आले आहे.