येरंडगाव केंद्रात केंद्रभूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
शिक्षणाच्या व विद्यार्थी हिताच्या शैक्षणिक बातम्या प्रसिद्धी करणाऱ्या पत्रकारांनचाही केला सत्कार.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
दि.२७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चिंचोली येथे शिक्षकांना केंद्रभुषण पुरस्कारासह विविध विभागांतील अधिकारी तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.शिक्षकदिन ५ सप्टेंबर चे औचित्य साधून दि.२७ सप्टेंबर रोजी येरंडगांव केंद्रातील दोन शिक्षक नामे सुरेश बोपटे मुख्याध्यापक कोपरी आणि सुभाष चव्हाण मुख्याध्यापक नागेझरी यांना केंद्रभूषण पुरस्कार व आदर्शक्ष शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात मा.तहसीलदार विजय साळवे,पारवा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रविण लिंगाडे, मोहनराव ढवळे,मानव लढे गटसाधन केंद्र घाटंजी,संजय पवार,गटसाधन केंद्र घाटंजी,शैक्षणिक बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध करून विद्यार्थी व शाळांचे हीत जोपासणारे पत्रकार अविनाश साबापूरे उपसंपादक लोकमत आवृत्ती यवतमाळ,अनंत नखाते दै.पुण्यनगरी ता.प्रतिनिधी,अरुण कांबळे दै. नमोमहाराष्ट्र ता. प्रतिनिधी घाटंजी यांचा ही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच जिल्हा आदर्श शिक्षक अतुल वानखडे स.अ.देवधरी संजय अ.तुरक पदोन्नती झाल्याने ग्रामस्थातर्फे सत्कार,कु मनिषा तालपेलवार शाळेतून बदली झाल्याने,यांचा यावेळी सत्कार व केलेल्या कार्याबद्दल गुणगौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास चंद्रप्रकाश वहाने शिक्षणाधिकारी पं.स घाटंजी,सुधाकर वांढरे विस्तार अधिकारी शिक्षण प.स. घाटंजी,संजय तुरक केंद्रप्रमुख येरंडगाव हे यांची प्रामुख्याने उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी शंकर कुसराम अध्यक्ष शा.व्य.समिती चिंचोली हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख संजय तुरक पाटील यांनी केले. प्रास्ताविक करतांना त्यांनी प्रामुख्याने केंद्रभूषण पुरस्कार हा एक उपक्रम असुन केंद्रातील शिक्षकांचा गुणगौरव व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे आपल्या प्रास्ताविकेतुन मतमांडत शिक्षकाने केलेल्या चांगल्या शिक्षण दिनाच्या कामाची पावती द्यायलाचं हवी हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुरेश बोपटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश उदार यांनी केले.कार्यक्रमास बहूसंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सहकारी उपस्थिती लाभली होती.