यवतमाळ जिल्हयात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात
दुचाकी चालवितांना हेल्मेट व कार चालवितांना सिटबेल्ट वापरा- अतुल सुर्यवंशी
प्रतिनिधी यवतमाळ
दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट परिधान करा तसेच कार चालवितांना सिटबेल्ट वापरा. आपण स्वता तसेच कुटूंब सुरक्षीत राहावे याकरीता वाहन चालवितांना कोणतेही नशापाणी न करता वाहन चालवा असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सुर्यवंशी यांनी केले. ते यवतमाळ येथे रस्ता सुरक्षा अभियान शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री अतुल सुर्यवंशी यांनी उपस्थित जनसमुदायास रस्त्यावर वावरतांना आपली काळजी आपण स्वतः घेण्याचे आवाहन केले. दिनांक ०१.०१.२०२५ रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, यवतमाळ येथे मा. उप प्रादशिक परिवहन अधिकारी, श्री. प्रशांत देशमुख यांचे मार्गदर्शनात संपुर्ण जिल्हयात दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.०१.२०२५ या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याकरीता उद्घाटनीय कार्यक्रम संपन्न झाला. या वर्षाच्या रस्ता सुरक्षा अभियानाचे ब्रिदवाक्य ” परवाह” काळजी स्वतःची, काळजी सर्वांची हे असुन या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी मान्यवरांनी रस्ता सुरक्षे संदर्भात आपले मनोगत, तसेच अपघाताबाबत आपले अनुभव थोडक्यात कथन केले. तसेच शासनाच्या या अभियानात समाजातील प्रत्येक घटकाने तसेच विविध शासकीय विभागांनी सहभागी होऊन सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने कार्यालयातर्फे राबविण्यात येणा-या कामकाज रुपरेषेचे,वितरीत करण्यात येणा-या विविध भित्तिपत्रकांचे,पॉम्लेटचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,विभाग यवतमाळ अंतर्गत चालकांची अपघात विरहीत सेवा देणारे श्री प्रमोद आडे, श्री जितेश दवाळे,या चालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन श्री दिवसे सर, डेपो मॅनेजर राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ श्री मेश्राम, DTO जिल्हा वाहतुक अधिकारी यवतमाळ, श्री महल्ले,क.अभियंता सा.बा.वि.यवतमाळ हे लाभले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री अतुल सुर्यवंशी, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ यांनी भुषविले. तसेच कार्यालयातील श्री परेश गावसाने, श्री प्रभाकर पेन्सिलवार, मोटार वाहन निरिक्षक विविध वाहन संघटनेचे प्रतिनिधी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यालयातील श्री संदीप खवले, वरिष्ठ लिपिक व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सतेश टुले, सहा. मोटार वाहन निरिक्षक यांनी केले.