यवतमाळ जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे। आयोजन
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक कृषि भवन यवतमाळ येथे सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास महाराष्ट्राचे मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या रानभाजी महोत्सवांमध्ये अनेक ग्रामीण भागचे शेतकरी, बचत गट यांनी सहभाग नोंदविला व कधी न पाहिलेल्या रानभाज्या या उत्सवामध्ये पाहायला मिळाल्या. यामध्ये प्रामुख्याने नाळ, पार्थि, श्वेतांबरी, उमर, सुरकंद, धोकरंद, कुंद्रा ची, माटाची भाजी, राजगिरा अश्या अनेक प्रकारच्या याबातमाळ कराना पाहवयास मिळाली. शहरातील अनेक लोकांनी या उत्सवा मध्ये सहभागी होऊन राणभाज्यांची खरीदी केली. शेतकरी त्या भाजीचे महत्व पटवून देत असताना लोक मोठ्या उत्साहाने ऐकत होते. राणभाजी उत्सवामुळे शहरातील लोकांना ग्रामीण भागाच्या राणभाजीचे महत्व पटले.