सासू म्हणाली ती दारूचं मागत आहे न तूझे रक्त तर नाही
जगात नवरा बायकोच्या वादाचे अनेक प्रकरण समोर येतात. या वादात कधी बायकोचे तर कधी नवऱ्याचे सासू सासरे उडी घेतात.आणि त्यामुळे कधी वाद मिटतो तर कधी संपतो.पण उत्तरप्रदेश च्या मैनपुरी मधून जे प्रकरण समोर येत आहे ते ऐकून पोलीस देखील पेचात पडले आहे. कारण येथे एका नवऱ्याला त्याची बायको रोज बिअर ची मागणी करते आणि दिली तर घर डोक्यावर घेऊन त्याला मारहाण करते. त्याने ही बाब त्याच्या सासू सासऱ्याच्या कानावर टाकली तर सासू म्हणते ‘ती दारूचं मागत आहे न तुझे रक्त तर नाही ‘
मैनपुरी / नवप्रहार मीडिया
घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधील आहेे. एका पतीने पत्नीविरोधात तक्रार केली आहे. बायको रोज बिअरची बॉटल मागवते एवढंच नाही तर त्यासाठी त्याचा संपूर्ण पगार खर्च करते, असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारमध्ये त्याने सांगितलं की, पूर्वी त्याची पत्नी रोज रात्री बिअर मागवायची, हळूहळू तिची ही सवय एवढी वाढली की, बिअरशिवाय तिचं होतं नाही आणि यासाठी ती त्याचे सगळे पैसे उडवून टाकते. त्या व्यक्तीची तक्रार ऐकून पोलिसांनाही पेचात अकडले आहेत.
पुढे तो व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा त्याच्या पत्नीला दारू मिळत नाही ती सर्व घर डोक्यावर घेते आणि गोंधळ घालते. एवढंच नाही तर ती पतीला मारहाणही करते, असंही त्याने पोलिसांना सांगितलं आहे. जेव्हा त्याने पत्नीच्या घरच्यांकडे तिची तक्रार केली तेव्हा तेही मुलीच्या या कृत्याने पुरते हादरुन गेले आहेत. पण त्यांचे उत्तर ऐकून त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. त्या व्यक्तीचे सासू सासरे म्हणाले की, तिला दारू पाजता येतं नाही मग लग्न तरी का केलं? एवढंच नाही तर सासू म्हणाली की, ती फक्त दारू पिते तुझं रक्त तर पीत नाही ना…
या सगळ्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आणि पत्नीच्या बिअरच्या व्यसनाला कंटाळून त्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली आणि मदतीची मागणी केली. या व्यक्ती पोलिसांना बायकोपासून सुरक्षेसाठी घराबाहेर पोलीस तैनात करण्याची मागणी केली आहे. जर ते सुरक्षा देऊ शकत नाही तर पत्नीला दारूच्या व्यसनातून मुक्त करावे, असं तो पोलिसांकडे म्हणाला. कारण त्याच्या पत्नीने त्यावर अनेक वेळा कुऱ्हाडीने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला आहे, अशी धक्कादायक आरोप त्याने पोलिसांकडे केला आहे.