शाशकीय

15 जुलै पासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर 

Spread the love
भंडारा / हंसराज 
                  शासनाला निवेदनाच्या माध्यमातून केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार होत नसल्याने दि. 15 जुलै पासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाच्या भूमिकेबाबत वरील संदर्भिय निवेदन शासनास बेमुदत संपाची नोटीस देण्यात आलेली आहे. मा. श्री. जिवन आहेर, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, मुंबई यांनी शासनास खालीलप्रमाणे आंदोलनाचे टप्पे ठरवून शासनास संपाची नोटीस दिलेली आहे.
महसूल कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या
1. महसूल विभागाचा संधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा.
2. अव्वल कारकून / मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार या पदावर पदोन्नती देणेबाबत शासन स्तरावर अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार निवेदन देवूनही अद्यापही पदोन्नती आदेश पारित झालेले नाहीत. तरी प्रस्तावित विधानसभा निवडणूक विचारात घेता राज्यातील सर्व विभागाचे अव्वल कारकून / मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार या पदावर आदेश तदर्थ पदोन्नतीसह निर्गमित करणेत यावे.
3. सुधारीत नविन आकृतीबंधनुसार पुरवठा विभागातील लिपिक टंकलेखक व अव्वल कारकून / पुरवठा निरिक्षक यांची पदे सरळसेवा भरती करण्यात येत असून सदर पदाचा सरळसेवा परिक्षेचा निकाल लागलेला आहे. त्यामुळे सदरील कर्मचारी हे माहे जुलै 2024 पर्यंत येणार आहेत. महसूल विभागातील अव्वल कारकून कर्मचारी हे आज रोजी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना मूळ महसूल विभागात सामावून घेण्यासाठी राज्यातील ब-याचशा जिल्हयात जागा हया रिक्त नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जर हे कर्मचारी महसूल विभागात रूजू झाल्यास अतिरिक्त ठरतील आणि वेतनाचा प्रश्न निर्माण होऊन भविष्यात कर्मचा-यांवर अन्याय होईल. त्यामुळे महसूल विभागाचा आकृतीबंद तात्काळ मंजूर केल्यास सदर कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेणे सुलभ होईल.
4. महसूल विभागात तसेच अंतर्गत सं.गा. यो. इं.गा. यो विभाग रोहयो विभाग व इतर सर्वच विभागातील वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा.
5. महसूल सहायक व तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अहर्ताधारी असूनही महसूल सहायक यांचा ग्रेड पे 1900/- व तलाठी यांचा ग्रेड पे 2400/- आहे. त्यामुळे महसूल सहायक यांचा ग्रेड पे 2400/- करण्यात यावा.
6. अव्वल कारकून ऐवजी सहायक महसूल अधिकारी या संवर्गाचे शासन स्तरावरून नामातंरण करून पदनाम बदलाबाबत मागणी मंजूर करणे.
7. नायब तहसिलदार संवर्ग हा राजपत्रीत संवर्ग असून सुध्दा त्याची वेतनश्रेणी वर्ग तीन संवर्गाची देण्यात आलेली आहे ती बदल करून 4800/- ग्रेड पे करण्यात यावा.
8. अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदला बदली धोरणानुसार ठरवून देण्यात आलेल्या प्रमाणात पदस्थापना देणेत येत नसल्याचे दिसून येत आहे. तरी सर्व जिल्हयांमध्ये शासन धोरणानुसार अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर पदस्थापना देणेत यावी.
9. नायब तहसिलदार पदासाठी अव्वल कारकून / मंडळ अधिकारी यांचेकरीता पदोन्नती, विभागीय परिक्षा, सरळसेवा परिक्षा याबाबतचे प्रमाण
70:10:20 करण्यास मान्यता देण्यात यावे.
10. चतुर्थ श्रेणी शिपाई कर्मचा-यांना पदोन्नती देत असतांना तलाठी संवर्गामध्ये 25% पदोन्नती देण्यात यावी आणि कोतवाल पदांना चतुर्थश्रेणी-ड दर्जा देण्यात यावा. कोतवाल पदोन्नती करीत असतांना पदोन्नतीचा कोटा वाढविण्यात यावा.
वरीलप्रमाणे महसूल कर्मचा-यांच्या मागण्या संदर्भात शासनाकडून सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने सर्व महसूल कर्मचारी आंदोलनाच्या पावित्रयात आहेत.
निदर्शनाचे स्वरूप :-
बुधवार दि. 10/07/2024 काळ्या फिती लावून काम करणे.,
गुरूवार दि. 11/07/2024
जेवणाच्या सुटीत कार्यालयाच्या गेटवर निदर्शने करणे
शुक्रवार दि. 12/07/2024
लेखणीबंद आंदोलन करणे.
सोमवार दि. 15/07/2024
बेमुदत काम बंद आंदोलन
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close