हटके

यालाच म्हणतात लाच खाणे ; त्याने चक्क चावून गिळल्या 500 च्या नोटा

Spread the love

कटनी ( मध्यप्रदेश )/ नवप्रहार वृत्तसेवा

              लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असला तरी ‘ सर्फ एक्सल है तो दाग अच्छे है ‘ या वाक्याप्रमाणे लाच देणारे लाच देतात आणि घेणारे घेतात सुद्धा.मध्यप्रदेश मधील कटनी जिल्ह्यातून लाचेचे एक प्रकरण समोर आले आहे.लाचखोर पटवऱ्याने लाचेची 5 हजार रुपयांची रक्कम घेतली.दरम्यान आयुक्तालयातील चमूने त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले . पकडल्या जाण्याच्या भीतीने त्याने लाचेच्या स्वरूपात घेतलेल्या 500 च्या नोटा चावून गिळल्या. यानंतर त्याला या चमूकडून त्या नोटा हस्तगत करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले .

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात बिल्हारी हलका गावात तैनात पटवारी गजेंद्र सिंह यांनी तक्रारदार चंदन सिंह लोधी यांच्याकडे एका जमिनीच्या प्रकरणात पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत चंदनसिंग लोधी यांनी लोकायुक्त जबलपूर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर लोकायुक्तांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पटवारीला लाच घेताना रंगेहाथ पकडले. मात्र पटवारी गजेंद्र सिंग याने लाच म्हणून घेतलेल्या ५००-५०० च्या नोटा तोंडात कोंबल्या.

या दरम्यान लोकायुक्तांच्या 7 सदस्यांच्या पथकाने नोटा काढून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोंडातून पैसे न काढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अथक परिश्रमानंतर पटवारी गजेंद्र सिंग याने लाचेच्या चघळलेल्या नोटा बाहेर काढल्या. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

लोकायुक्त टीमचे नेतृत्व करणारे कमलसिंग उईके सांगतात की, तक्रारदार चंदन लोधी यांच्या तक्रारीवरून लाच घेणारा पटवारी गजेंद्र सिंग याला 5 हजार रुपयांसह पकडण्यात आले, मात्र टीमला पाहून त्याने ती नोटा खाल्ल्या. टीमकडे व्हॉईस रेकॉर्डिंगसह इतर पुरावे आहेत, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या आरोपी गजेंद्र सिंह याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close