राज्य/देश

या पक्षाच्या नेत्यावर होताहेत सुंदर महिला आणि तरुणींना उचलून नेऊन बलात्कार करण्याचे आरोप 

Spread the love

कार्यकर्ते घरोघरी जाऊन हेरतात सुंदर महिला आणि तरुणींना 

कोलकाता / नवप्रहार मीडिया 

                  घरोघरी जाऊन सुंदर महिला आणि तरुणींना हेरून त्यांची यादी तयार करत आहोत असे भासवून त्यांना पक्ष कार्यालयात बोलवून त्यांच्यावर  मन भरेपर्यंत बलात्कार करणे त्या आल्या नाहीत तर त्यांना बळजबरीने उचलून नेणे आणि त्यांच्या शरीराचे मनसोक्त लचके तोडणे हा  किळसवाणा आई लज्जास्पद प्रकार पश्चिम बंगाल च्या टीएमसी पक्षाच्या एका आमदारकडून केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. महत्वाचे म्हणजे या विषयाला घेऊन महिलांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. घटनेनंतर हा आमदार फरार झाला आहे. ज्या पक्षाची प्रमुख एक महिला आहे त्या पक्षाच्या आमदारा कडून होत असलेल्या या अन्यायाला महिलांनी वाचा फोडली आहे. 

पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे लोक घरात घुसतात, असा आरोप महिलांनी केला आहे. जर एखादी स्त्री सुंदर दिसली तर ते तिला सोबत घेऊन जातात. तिच्यावर अनेक दिवस बलात्कार होतो. त्यांचं मन भरेपर्यंत ते त्या महिलांना आपल्या ताब्यात ठेवतात आणि नंतर सोडून देतात.

टीएमसी लोकांकडून होत असलेल्या या अत्याचाराविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे. महिलांनी आरोप केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये महिला म्हणते, “पक्षाचे (तृणमूल) लोक येतात. ते घरोघरी जातात आणि पाहतात की कोणाची पत्नी आणि कोणाची मुलगी तरुण आहे. कोण सुंदर आहे. यानंतर ते महिलेला पक्ष कार्यालयात घेऊन जातात आणि अनेकवेळा तिच्यावर बलात्कार करतात.

याप्रकरणी महिलांनी स्थानिक टीएमसी नेते आणि जिल्हा परिषद सदस्य शेख शाहजहान यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून ठेवले असून, त्याच्या अटकेची मागणी केली आहे. शेख शाहजहान हा तोच नेता ज्याने ईडी धाड टाकायला आली असताना, ईडीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. त्याच्यावर जमीन हडप केल्याचा आरोपही महिलांनी केला आहे. ईडीवर हल्ला केल्याच्या प्रकरणात शेख शाहजहान फरार आहे.

संदेशखळी हे सुंदरबनमधील एक बेट

संदेशखळी हे पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात आहे. हे सुंदरबनमधील एक बेट आहे. इथून बांगलादेशची सीमा जवळ आहे. या बेटावर फक्त बोटीने जाता येते. भाजपचे पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवर पोस्ट केले: “शेख शाहजहान आणि त्याच्या टोळीने संदेशखळीमध्ये ‘दहशतवादाचे राज्य’ स्थापन केले आहे. एससी आणि एसटी समाजातील महिलांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केले जात आहे.

संदेशखळी येथील महिलांचं आंदोलन

संदेशखळीच्या महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आणि टीएमसी नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात निदर्शने केली. एका व्हिडिओमध्ये विरोध करणाऱ्या एका महिलेने म्हटले आहे की, टीएमसीचे लोक रात्रीच्या वेळी त्यांच्या आवडीच्या कोणत्याही महिलेला कार्यालयात घेऊन जातात. तिच्या पतीला सांगितले जाते की त्याचा महिलेवर कोणताही अधिकार नाही.

एका महिलेने आपल्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितले की, ते आमच्याशी गैरवर्तन करतात. येथील महिला सुरक्षित राहू शकत नाहीत. महिला बाहेर पडायला घाबरतात. पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांसह 20-30 लोक त्यांच्या घरी आले. खिडकी आणि दरवाजा तोडला होता. “त्यांनी माझे केस ओढले आणि माझ्या हातून माझी मुलगी हिसकावून तिला फेकून दिले,” असं पीडित महिलेनं म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close