सांजापूर , हिरपुर येथे रविवार ची शाळा नवोनित उपक्रम.
आरोळी सामाजिक संस्थेचा अनोखा कार्यक्रम .
नव प्रहार / अनिल डाहेलकर
मूर्तिजापूर : तालुक्यामधील ग्राम सांजापूर , हिरपूर येथे आरोळी सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार ची शाळा ह्या उपक्रम सुरू करण्यात आला. आठवड्यातून एक दिवस ह्या शाळेचे आयोजन असते. या मधून सहभागी मुलांसाठी विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घेवून संस्कार सह निसर्गा सोबत ची आपुलकी , ज्येष्ठ नागरिकांचा मित्र बनने, अभ्यास विषयातील गुणवत्ता वाढवण्यासाठी चर्चा सत्र असे विविध प्रकारचे घटक आधारित बाल हक्क संदर्भात जनजागृती करणे अशी रविवार ची शाळा ह्या अनोख्या उपक्रमाला सुरू करण्यात आली . तेव्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुमेध अनभोरे , प्रमुख अतिथी तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय राऊत , उमेद चे वर्षा पुंडे , प्रशांत ढगे , उपसरपंच किशोर डांगे , रामा राठोड , मुख्यधापक अंबलकर , मुख्याध्यापक मालवे , पत्रकार प्रविण ढगे, यशदाचे प्रविण प्रशिक्षक,पत्रकार समाधान इंगळे , राजू कांबळे, शुभांगी (लाहुडकर) तायडे , समाधान वानखडे , बचत गटाचे लता राऊत , कविता तायडे , अंजली उंबरकार, सुनीता चारथळ, रजनी सराफ , अंजली हागे , रुपाली राठोड , सुनीता गुजरकर , कोमल चोहे , पुनम सोळंके सह बहु संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता अमोल तायडे , वैशाली ढगे यांनी केले तर प्रस्ताविक समाधान इंगळे यांनी केले असून आभार प्रदर्शन शुभांगी (लाहुडकर) तायडे यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वैशाली प्रशांत ढगे यांनी परिश्रम घेतले .