अंजनगाव येथे जागतिक फार्मासिष्ठ दिन साजरा
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी शहरातील कौशल्या श्रृंगारे एज्युकेशन फाउंडेशन मुंबई, द्वारा संचालित विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी अंजनगाव सुर्जी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ज. मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक फार्मा सिष्ठ दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशिएशनच्या अमरावती झोनचे सहसचिव राजाभाऊ टांक हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कविता लोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम मेहेत्रे व अंजनगाव तालुक्यातील केमिस्ट आणि ड्रगिष्ठ असोशिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,
सर्वप्रथम महाविद्यालयामधे ड्रग इन्फॉरमेशन सेंटर चे उद्धाटन करन्यात आले, ज्याद्वारे विविध प्रकाच्या औषधीबद्दल जाणून घेणे सोपे होईल. त्यानंतर ई.पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सह भाग नोंदवून विविध प्रकारचे पोस्टर बनवून त्यांची इत्यंभूत माहिती व महत्व परिक्षकांना पटवुन दिले व नंतर प्रश्नमंजूषेचे आयोजन करन्यात आले होते, शेवटी स्पर्धेमध्ये सहभागी व विजेत्या विद्यार्थ्याना बक्षीस व प्रमापत्र देवून गौरविण्यात आले, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय डॉ. मेहेत्रे यांना महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षेक्तराना दिले व कार्यक्रमाचा शेवट उपस्थितांचे आभार श्री धुमाळे सर अकोटकर सर गीते सर यांनी मानून करण्यात आला….