नगरपरिषद शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन.
मुख्याधिकारी तथा प्रशासक रविंद्र पाटिल यांचा सत्कार.
वरूड/तूषार अकर्ते
न.प.प्राथमिक शाळा क्र १ शें घाट येथे मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिक्षण परिषदेला प्रशासन अधिकारी विजय बेलसरे, अमोल ढोले, न.प.प्राथमिक शाळा क्र १ च्या मुख्याध्यापिका कीर्तीमाला धुर्वे, न.प.प्राथमिक शाळा क्र २ चे मुख्याध्यापक भाऊराव हरले, न.प.प्राथमिक शाळा क्र.३ चे मुख्याध्यापक विजय राऊत, न.प.उच्च प्राथमिक शाळा क्र ४ च्या प्रभारी मुख्याध्यापिका कांडलकर मॅडम, न.प.उच्च प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मकसूद अहमद, विशेष शिक्षक प.स.वरुड येथील कांचन इंगळे व शिक्षक वृंद उपस्थित होते.महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. न.प.शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल व शालेय अडचणी दूर करण्याकरिता पुढाकार घेणारे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांचा या वेळी सर्व मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीमाला धुर्वे यांनी आपल्या प्रस्ताविकेत शिक्षण परिषद, शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक समिती याविषयी माहिती दिली आहे.तर प्रशासन अधिकारी विजय बेलसरे यांनी न.प.शिक्षण विभाग प्रगती,विद्यार्थी सर्वांगीण विकास याबाबद आपले विचार व्यक्त केले आहे.
प.स.वरुड येथील शिक्षिका कांचन इंगळे यांनी विशेष गरजा असणाऱ्या मुलांची आभासी ॲप व्दारे माहिती शिक्षकांना दिली आहे.तसेच शिक्षिका नेहा सुपले यांनी सेतू अभ्यासक्रम कार्यवाही व अंबलबजावणी, शिक्षक नितीन गायकवाड यांनी प्रगती दर्शक श्रेणी निर्देशांक यावर मार्गदर्शन केले आहे.या कार्यक्रमावेळी मुख्याधिका-यांनी शिक्षकांसोबत चर्चा करून शाळेपुढील आव्हाने सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.सदर परिषदेचे सूत्रसंचालन सविता बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षिका कांता हरले यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन शिक्षक आशिष तडस यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शोभा लेकुळवाडे, संदीप कोकाटे, मोनिका डहाके व शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले आहे.