कार्यकर्त्यानी सदस्य नोंदनी अभियान यशश्र्वी करावे

संघटन पर्व कार्यक्रमात आमदार रणधिरजी सावरकराचे कार्यकर्त्याना आव्हाहन
बाळासाहेब नेरकर कडून
त्याग समर्पण विश्वास, विकास सामाजिक दायित्व सर्वांना सोबत घेण्याची भावना ही केवळ भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे विश्वातील सर्वात मोठी पार्टी असुन अनेक संघर्ष अनेक आरोप झाल्यावर सुद्धा विचाराशी तडजोड न करता राष्ट्र निर्माण मध्ये आपला योगदान देऊन देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प घेऊन देशात सर्वात जास्त लोकप्रतिनिधी बनवण्याचा संकल्प पूर्ण केला 27 वर्ष संघर्ष करून स्वतःपेक्षा विचार महत्त्वाचे हे जाणून काम केले त्यामुळे दिल्ली येथे विजय प्राप्त झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी ,कुशा भाऊ ठाकरे, श्यामाप्रसाद मुखर्जी , दीनदयाल उपाध्याय, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे उत्तमराव पाटील, भाऊसाहेब फुंडकर मोतीरामजी लहाने, प्रमिलाताई टोपले, भाऊसाहेब राजनकर, संजय भाऊ धोत्रे, गोवर्धन शर्मा, शंकरलालजी, खंडेलवाल, एडवोकेट दादा देशपांडे सारख्या नेत्यांनी पक्ष विस्तारासाठी कार्य केले त्यांचा त्याग समर्पण आणी विश्र्वास हेच पक्षाची ताकद असल्यामुळे कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी अभियान हा कार्यक्रम यशस्वी करावा अशीही आमदार सावरकर म्हणाले.
अकोला भाजपा महानगर तर्फे संघटन पर्व निमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते बैठकीचे अध्यक्षस्थानी महानगराध्यक्ष जयंत मसने हे होते तर मंचावर खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल किशोर पाटील अर्चना मसने माधव मानकर संजय गोटफोडे, एडवोकेट देवशिष काकड, रमेश अलकरी आम्रपाली उपरवट, पवन महल्ले, योगिता पावसाळे सुमन ताई गावंडे सिद्धार्थ शर्मा, डॉक्टर अभय जैन, एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर राहुल देशमुख, गीतांजली शेगोकार वैशाली शेळके, माधुरी बडोने, चंदा ठाकूर सारिका जयस्वाल, संदीप गावंडे गणेश अंधारे संतोष पांडे रमेश करिअर निलेश निनोरे, व्यंकट ढोरे, धनंजय धबाले, जस्मित ओबेराय, दिलीप मिश्रा डॉक्टर किशोर मालोकार, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी भाजपा म्हणजे विश्वास भाजपा संघटन विकास, भाजपा म्हणजे सर्वांना सोबत घेऊन मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणारी पार्टी, भाजपा म्हणजे सर्वसामान्यांचा आधार भाजपा म्हणजे सांस्कृतिक संवर्धन भाजपा म्हणजे राष्ट्रवाद या विचाराने प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रेरीत होऊन कार्य करावे व संघटन परवाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांशी जोडण्याचं काम करावं असे आव्हान केले कार्यक्रमाचे संचालक एडवोकेट देवाशिष काकड तर प्रास्ताविक विजय अग्रवाल आभार प्रदर्शन जयंत मसणे यांनी केले.