हटके

मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याला बोलाऊन घेत त्याची काढली चड्डी  अन….

Spread the love
प्रतिनिधी  / नवप्रहार मीडिया 

         बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बुद्रुक गावातील शाळेत  एक धक्कादायक आणि शिक्षकी पेश्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील शिक्षिकेने मुलाने वडिलांना तक्रार केल्याच्या रागावरून त्याला खोलीत बोलावून त्याची चड्डी काढून गैरवर्तवणूक केली आहे. वडिलांनी पोलिसात मुलाचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार दिल्याने शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 
 घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद शाळेत केळी वाटण्यात आली होती. काळी पडलेली केळी का वाटली या मुद्द्यावरून पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांचा आणि मुख्याध्यापिकेचा वाद झाला होता

दरम्यान या वादानंतर मुख्याध्यापिकेने पीडीत विद्यार्थ्याला दुपारी वर्गखोलीत बोलावले. “माझी कंप्लेंट वडिलांकडे करतो काय, बदली करायला लावतो काय, थांब तुला दाखवते” असे म्हणत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याची चड्डी काढून विद्यार्थ्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे घाबरलेला विद्यार्थी पळत घराकडे निघाला. पळत असताना तो शाळेत पडला. त्याच्या पायाला मार लागला आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुलाचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप करत संबंधित मुख्याध्यपीकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वडिलांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
2
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close