दवलामेटी जि.प.सर्कल मध्ये महिलांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न
महिलांनी स्वतः विषयी जागृत रहावे – ममता धोपटे (जि.प.सदस्य)
वाडी(नागेश बोरकर): महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर तर्फे नुकतेच दवलामेटी सर्कल अंतर्गत मानकर सभागृहात महिलांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. यावेळी मंचावर दवलामेटी सर्कलच्या जि.प.सदस्या ममताताई थोपटे,पं.स.च्या माजी उपसभापती रेखा वरठी,पं.स.सदस्या सुलोचना ढोके,उच्च न्यायालयाचे विधीतज्ञ साहिल भांगडे, डॉ.तायवाडे,डॉ.कविता केसरवानी,पं.स.च्या सीडीपीओ उज्वला ढोके, माया भुसारी,शर्मिला जाधव, शेवाळे इत्यादी उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थितांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले.माॅ जिजाऊ यांच्या फोटोला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन केले. यावेळी सीडीपीओ उज्वला ढोके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली.
मार्गदर्शन मिळाव्यात उपस्थित ॲड.साहिल भांगड़े यांनी महिलांचे हक्क व अधिकार या बद्दल विशेष माहिती दिली.तर डॉ.तायवाड़े यांनी किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, कुटुंब नियोजन इं. आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.तर डाॅ.सुषमा केसरवानी यांनी आहारा विषयी महिलांना माहिती दिली.
यावेळी प्रमुख अतिथी जि.प. सदस्या ममता धोपटे यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की, जि.प.महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याचे सांगून जागतिकीकरणाच्या आजच्या दिवसात तंत्रज्ञान प्रगत होत असताना आपले शारीरिक,मानसिक आरोग्य गंभीरपणे धोक्यात आले आहे.त्यामुळे महिलां मध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढत आहे. देशाला सक्षम बनविण्याच्या दृष्टीने महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे.प्रत्येक महिला मानसिक दृष्ट्या सक्षम झाली तर कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकते.यासोबतच महिलां आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनल्या पाहिजे.त्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी गृह उद्योग चालवून स्वतःची आर्थिक प्रगती करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.तर महिलां आपले काम,व्यवसाय,कुटुंब,मित्र,नातेसंबंध इं. जपत असताना अत्यंत व्यस्त जीवनातही दररोज स्वतःसाठी आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी वेळ काढलाच पाहिजे.तेव्हाच महिलांना समाजात योग्य तो सन्मान प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
संचालन विजया तभाने यांनी तर आभार सुलोचना ढोके यांनी मानले.कार्यक्रमाला दवलामेटी जि.प. सर्कलमधील ग्रा.पं.,पं.स. सदस्या, महिला बचत गट व गृहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.