सामाजिक
नगर परिषद मध्ये महिला दिन साजरा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधि
नगर परिषद कार्यालय धामणगांव रेल्वे अंतर्गत जागतीक महीला दिना निमीत्त महीलाना करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आज दिनांक ८ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता नगर परिषदेचे स्वामी विवेकानंद अभ्यासिका चे भव्य इमारती मध्ये आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती पुष्पाताई गुरदे मुख्याध्यापिका न.प.धारे यांनी केले. कार्यक्रमाचे उदघाटक मा. सौ. अर्चनाताई रोठे (अडसड) महिला उद्योजक यांनी मनोगत व्यक्त करून महिलांना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेउन उद्योगाकडे वळण्याकरिता मोलाचे संबोधन केले. तदनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांत ल. उरकुडे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद धारे. यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांना उद्योगा संबंधी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक मा. श्रीमती शेख वसिमा हैदर साव उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार धा. रे. यांनी उपस्थित महिलांना व अभ्यासिकेतिल उपस्थित विध्यार्थि व विध्यार्थिनीना अंत्यत मोलाचे (महिला करिअर) मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथि मा. प्रियंका ताई चंद्रशेखर चौधरी सहायक पोलिस निरीक्षक दत्तापुर धारे यांनी उपस्थित महिलांसमोर सायबर क्राईम व महिलांवर होणा-या अत्याचारा बाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच प्रमुख अतिथी मा. डॉ. प्रमिलाताई कडू कुषि विज्ञान केंद्र यांनी उपस्थित महिला प्रेक्षकांसमोर विविध उद्योगाबाबत व महिला सक्षमीकरण बाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच महिलांनी आपआपल्या क्षेत्रामध्ये उत्कुष्ट
कामगिरी केलेली आहे. अशा महिलां मधिल (१) कविता राम व्यास सफाई कामगार (२) सौ. सविता चावरे सफाई कामगार नगर परिषद धामणगांव रेल्वे यांनी स्वच्छता कामात उत्कुष्ट काम केल्याबददल स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या निकषाप्रमाणे सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले. तसेच कु. ऐश्वर्या शरदराव भोगे शहर समन्वयक न.प. धा.रे. यांनी जागतिक महिला दिना निमीत्त महिलांनी रोजगार कसे करावे व होम कंपोस्टींग करून व्यवसाय कसा निर्माण करावा व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मधिल सुचनेप्रमाणे आपण यावर काम करू शकतो या बाबत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किशोर बागवान प्रकल्प अधिकारी एन.यु.एल.एम. न.प.धा. रे. यांनी केले व श्री. जयकुमार पांडे आस्थापना लिपीक यांनी स्वागत भक्तीगीत सादर करून उपस्थीतांचे मन जिंकले. शेवटी समारोपीय कार्यक्रम श्री. अविनाश डगवार सहा ग्रंथपाल तथा महिला व बालकल्याण विभाग प्रमुख न.प.धा.रे. यांनी केले. यावेळी न.प.चे सर्व कर्मचारी व शिक्षक बुँद अधिकारी वर्ग मोठया संखेने उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1