सामाजिक

पेपरवाले देविदास पाटील यांचा सत्कार चाळीस वर्षांपासून करताहेत वृत्तपत्र वितरण वृत्तपत्र विक्रेता दिनाचे निमित्त

Spread the love

 

अंजनगावसुर्जी , मनोहर मुरकुटे

 

 ऊन,वारा,पाऊस असो वा थंडी गेल्या चाळीस वर्षात वर्षाकाठी असलेल्या आठ सुट्या वगळता देविदास पाटील पेपर घेऊन आले नाहीत असा दिवस आठवत नाही वयाची तब्बल चाळीस वर्ष वृत्तपत्र वितरण व्यवसायात सेवा देणारे शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या पांढरी (खानमपुर) येथील रहिवाशी देविदास पाटील अजचे वय वर्ष पासष्ट यांचा रविवारी (ता.१५) वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने येथील बस स्थानक परिसरात कर्तव्यावर असलेले वाहतूक नियंत्रक निलेश अघडते यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

******** आपल्या देशाचे थोर शास्त्रज्ञ राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा दिवस २०१७ पासून तीनही ऋतूत वातावरणाची पर्वा न करता वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचविण्याची कडी मेहनत करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केल्या जातो या दिनाचे महत्व जाणून देविदास पाटील यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार रविवारी (ता.१५) सकाळी बस स्थानक परिसरात वृत्तपत्र व्यवस्थापन संपताच वाहतूक नियंत्रक निलेश आघडते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गजेंद्र मंडलिक, पवन गोतमारे,गजानन चांदूरकर, दिलीप साबळे,वृषभ अस्वार, उमेश नितनवरे, जय तांबे ,श्याम इंगळे, अकबर अली, सचिन अब्रुक, अमोल गोतमारे, गौरव दुर्गे यांची उपस्थिती होती

**************

सायकलिंग ने सुदृढ शरीर

****** दीड एकर शेती असलेले देविदास पाटील हे अल्पभूधारक शेतकरी असून चाळीस वर्षापासून पेपर विक्री चे काम करत असताना ते दररोज सकाळी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी येथून सायकल ने येतात प्रथम अंजनगावात पेपर वाटप करतात व नंतर पुन्हा परत पांढरी येथे परतल्यावर तेथे पेपर वाटप करतात नंतर दुपारी शेतात जाऊन शेतीचे काम करतात अशी अखंडित दिनचर्या करतांना त्यांचा दररोज तब्बल २० किलोमिटर सायकलिंग प्रवास होतो हाच त्यांचा सर्वोत्तम व्यायाम ठरत असल्याने गेल्या चाळीस वर्षात पाटील यांनी दवाखान्याची पायरी ओलांडली नाही आणि तब्येत ठीक नसल्याने पाटील पेपर वाटायला येणार नाहीत असा दिवस सुद्धा आठवत नाही त्यामुळे त्यांच्या सुदृढ तेचे रहस्य त्यांची सायकलिंग असल्याचे बोलले जाते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close