वर्धा जिल्हा परिषदेतून – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला आलेल्या 70 लक्ष रु निधी ची चोरी
आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे आक्रमक
*आर्वी उपविभागीय अभियंता कार्यालयावर प्रमुख पदाधिकार्या सह धडकले*
आर्वी : दिनांक 1/04/2024 रोज सोमवार ला दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे हे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद उपविभागीय बांधकाम विभाग आर्वी कार्यालयात धडकले यावेळी विचारणा केली असता उपविभागीय अभियंता तथा प्रभारी कार्यकारी अभियंता जुमडे हे कार्यालयात नव्हते यावेळी कार्यालयात उपस्थित स्थापत्य अभियंता अर्चना चहांदे आणि, स्थापत्य अभियंता राठोड यांच्याकडे विचारणा केली असता साहेब आज वर्धा मिटिंग ला असल्याचे सांगण्यात आले, यावेळी आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून राष्ट्रवादी च्या वाटयाला आलेल्या निधीबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांन कडे उत्तर नव्हते दिलीप पोटफोडे यांनी आक्रमक बाणा घेत प्रभारी अभियंता जुमडे यांना कार्यालयात बोलवा आम्ही थांबतो अशी भूमिका घेताच स्थापत्य अभियंता चहांदे मॅडम सहाय्यक अभियंता राठोड यांनी प्रभारी अभियंता यांना मोबाईल वर अनेकदा कॉल केलेत परंतु प्रभारी अभियंता जुमडे कडून प्रतिसाद मिळत नव्हता, यावेळी दिलीप पोटफोडे व पदाधिकारी नि भूमिका विशद करताना सांगितलं कि राज्यात महायुती सरकार आहे आणि सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा महत्वाच्या भूमिकेत असून महायुती अभेदय राहावी यां साठी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार, विदर्भाचे सुपूत्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सुधीर मुंनगटीवार, खासदार रामदासजी तडस हे सर्व समावेशक भूमिका घेत असताना,
महायुती त खडा टाकण्याचा काम काही स्थानिक नेते करत असतील आणि त्यांचा अभय घेत अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वाट्याला आलेला निधी परस्पर विकण्याच काम करत असेल तर लोकशाहीपद्धतीने आणि प्रसंगी आक्रमकतेला जबाबदार अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या हक्काचा वाटा सोडणार नसल्याचं ठणकावून सांगत जिल्हा परिषद उपविभागीय बांधकाम विभाग आर्वी भ्रष्टाचारी वृत्ती ठेचून काढल्या शिवाय राहणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन पत्र सादर करत,3054 हेड वर सुचवलेले कामाचे पत्र, पालकमंत्री सुधीरजी मुंनगटीवार यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या नावाने 3 कोटी अलॉट केलेले पत्र, व आर्वी विधानसभा क्षेत्राचे जिल्हा परिषद बांधकाम विभागातून चोरी गेलेले व विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी सुचवलेले 70 लक्ष रु कामाचे पुरावे दाखवले यावेळी निवेदन स्वीकारत स्थापत्य अभियंता अर्चना चहांदे, राठोड यांनी उपविभागीय अभियंता श्री जुमडे कार्यालयात येताच आपल्या शी चर्चा घडवून आणण्याच्या शब्दावर विश्वास ठेवत निवेदन देत त्वरित चोरी झालेले राष्ट्रवादी चे काम मार्गी लावा अन्यथा परिणामा ला भोगायची तय्यारी ठेवा असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी पुरुष व महिला पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते