स्त्रियांना नारी शक्ती बरोबरच आदिशक्तीचे रूप- जयश्री डावरे
स्नेह 75चे वतीने कन्या पूजन व नारी शक्ती सन्मान
नगर- हिंदू धर्म हा जगातील एकमेव प्रमुख धर्म आहे स्त्री देवत्याच्या रूपात देवाच्या उपासनेवर भर देतो स्त्रीला आदिशक्ती माता देवी म्हणून ओळखले जाते नवरात्र उत्सवात नऊ दिवस व्रत करून स्त्रिया ह्या जीवन आणि प्रेमाचे सार दर्शविते अशा या नारी शक्तीचा सन्मान कोजागिरी पौर्णिमेला करण्याचा स्नेह 75 चा संकल्प पूर्ण झाला, असे प्रतिपादन जयश्री डावरे यांनी केले.
सावेडीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या नारींचा सन्मान स्नेह 75 च्या वतीने करण्यात आला. कन्या पूजन व नारी शक्तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अस्मिता अष्टेकर इंटिरियर डिझायनर झेंबा शेख, पूजा पवार, कु.सई, कु. ध्रुवी , रजनी ढोरजे आदींसह स्नेह 75 चे सदस्य उपस्थित होते.
जयश्री डावरे पुढे म्हणाल्या, स्त्रिया या शांत, संयमी, सहनशीलता अशा स्वभावाच्या असतात मात्र अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांचे रौद्ररूप पहावयास मिळते मात्र तिच्या दैवी शक्ती पुढे कोणी टिकत नाही अशा या नारीचे रूप नवरात्र उत्सवात विविध दैवी रूपात पाहायला मिळते.
स्नेह 75 च्या वतीने डॉ.अस्मिता अष्टेकर यांच्या होमिओपॅथिक रुग्णालयातून सर्वसामान्य लोकांना सेवाभावी वृत्तीने सेवा देतात. अरणगाव येथील मेहरबाबा ट्रस्ट च्या दवाखान्यात सेवा सुरू आहे. इंटीरियर डिझायनर पूजा पवार, झेंबा शेख यांनी देखील सुट्टीच्या कालावधीत मुलींना स्त्रियांना आपल्या कला कौशल्याचा उपयोग कसा करून देता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहतात अशा या महिलांचा सन्मान करण्याचा मानस असल्याचे प्रास्ताविकात ईश्वर सुराणा यांनी सांगितले.
यावेळी डॉ. प्रवीण रानडे, डॉ. शशिकांत उदास, सागर अष्टेकर, दिलीप डावरे, किशोर रेनाविकर, अनिल चाबुकस्वार, दिलीप अकोलकर, धनेश बोगावत, शैलेंद्र गांधी, विजय संकलेचा उपस्थित होते.
शेवटी सर्वांचे गुलाब गोरे यांनी आभार मानले.
..
नवरात्र उत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला नारींचा सन्मान व कन्या पूजनाने झाली स्नेह 75 च्या वतीने डॉ.अस्मिता अष्टेकर इंटीरियर डिझायनर झेंबा शेख, पूजा पवार यांचा सत्कार कु.सई, कु.धृवी यांचे कन्या पूजन करण्यात आले. याप्रसंगी रजनी ढोरजे, जयश्री डावरे उपस्थित होते. ( छाया: विजय मते)