सामाजिक

शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला ; महिला ठार 

Spread the love
उचलून झुडपी जंगलात नेल्याने शोधण्यास झाला उशीर
ब्रम्हपुरी / नवप्रहार मीडिया नेटवर्क 
             तालुक्यातील तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेठी नियत क्षेत्रातील, उश्राळा मेंढा रीट, परिसर गट क्र. 2, संरक्षित वनक्षेत्र परिसरात, शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आंहे. श्रीमती देवता जीवन चनफने वय 42 वर्ष,  असे महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार देवता चनफने शेतात कामात व्यस्त असतांना वाघाने हल्ला करून तिला ठार केले आणि उचलून झुडपी जंगलात नेले . महिला घरी न परतंल्याने घटना उघडकीस आली. महिलेचा शोध घेतला असता रात्री 9.30 वा. तिचा मृतदेह सापडला.
घटनास्थळी तळोधी बाळापुरचे अतिरिक्त कार्यभार असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात तळोधीचे क्षेत्रसहाय्यक वाळके, गंगासागर हेटी चे वनरक्षक एस.एस. कुळमेथे, तळोधी (बा) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोवर्धन, यांच्या उपस्थितीत मौका पंचनामा करून शवविच्छेदनास नागभिड येथे रवाना करण्यात आले.
मुलं झाली पोरकी , वडिलांचे झाले होते अपघातात निधन – चनफने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कारण देवता हिचे पती  जीवन ह्यांचे एक वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते. कुटुंबाची जबाबदारी देवता यांच्यावर येऊन ठेपली होती . पण आता देवता यांचे निधन झाल्याने मुलं पोरकी झाली आहेत.
वनविभागा कडून  तात्काळ मदत म्हणून मृतकाच्या परिवाराला 25,000 (पंचवीस हजार) रुपये ची मदत करण्यात आली व लवकरात लवकर उर्वरित 19 लाख 75 हजार ही मदत सुद्धा परिवाराला करण्यात येणार आहे. तरी या परिसरात वाघाचे वास्तव असल्याने शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे वनविभागा तर्फे सर्वांना सूचित करण्यात आले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close