क्राइम

महिलेला धमकावून सामूहिक बलात्कार 

Spread the love

कर्जत / नवप्रहार डेस्क

                    पहिले ओळख केली. ती वाढवून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला आक्षेपार्ह फोटो मोबाईल वर टाकायला लावले. आणि त्यानंतर ते समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर देखील त्याने ते छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले.याच छायाचित्राच्या भरवश्यावर आणखी सहा लोकांनी तिच्या शरीराचे लचके तोडले. यां घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करत सातही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कर्जतमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघडकीस आलीय. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना बेड्या देखील ठोकल्या  आहेत. आरोपी ठाकूरवाडी येथे राहत असल्याची माहिती मिळतेय. या आरोपीने आरोपीने आधी पीडित महिलेबरोबर ओळख वाढवली. हळुहळू तिचा विश्वास देखील संपादन केला.

 

 

कर्जतमध्ये सामूहिक बलात्काराची घटना

त्यानंतर आरोपीने पीडित महिलेचे मोबाईलवर आक्षेपार्ह छायाचित्र (Woman Physically Abused) मागवलं. पीडित महिलेने त्याला हे फोटो पाठवले. नंतर आरोपीने हे छायाचित्र सोशल मीडियावर टाकेल अशी धमकी देत तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही त्याने ते छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. नंतर इतर सहा आरोपींनी देखील पीडितेला छायाचित्र प्रसिद्ध करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलीय. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close