यवतमाळ येथे मिस्टर व मिस चे महाराष्ट्र फॅशन शो आणि डान्स चॅम्पियनशिप चे ऑडिशन,आणि प्रतिभा फाॅडेशन उद्घाटन. स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाल / प्रतिनिधि
टीम झेनित व प्रतिभा फाउंडेशन प्रस्तुत यवतमाळ येथील सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभामंडपात मिस्टर व मिस फॅशन शो आणि डान्स चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रलय टिंपलवार मंचावर विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती धोटे,प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त इंजी.प्रतिभा पवार डॉ. सुधा खडके, दैनिक अमरावती दर्शनचे जिल्हा प्रतिनिधी विजय बुंदेला, कीर्ती राऊत, विद्या खडसे, फिल्म डायरेक्टर अर्जुन चव्हाण,श्री शेळके ज्युरी डॉ. निकिता चव्हाण, ज्युरी डॉ. सारिका शॅहा,सुधीर कैपल्लीवार इत्यादी मान्यवर मंचावर विराजमान होते. अध्यक्ष अन्याय निवारण समिती क्रांती धोटे यांच्या शुभहस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत शारदा देवीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून प्रतिभा फाउंडेशन चे उद्घाटन करण्यात आले.
उद्धघाटना नंतर फॅशन शो डान्स स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये फॅशन शो मध्ये 21 तर डान्स स्पर्धात सात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांच्या निवडीनंतर त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना अमरावती येथे होणाऱ्या फायनल फॅशन शो मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे असे आयोजका कडून सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी करता टीम झेनिथ चे मिथिल कळंबे, डान्स कोरोग्राफर सचिन वानखेडे,सनराइज संस्थापक दिनेश पवार, स्मीती देशमुख, शंतनु देशमुख,सुनिता वाजवे, वैष्णवी मस्के व अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खडके यांनी आणि पाहुण्यांचे आभार प्रतिभा पवार यांनी मानले. प्रतिभा फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन शेळके अबोली डीक्कर देशमुख शाहिस्ता खान उपस्थित होते . बेताब शायर, नवनाथ दरोई उपस्थित होते.कार्यक्रमाला स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.