महिलेने कार्यालयात घुसून चपलेने केली मारहाण , व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही नेटकऱ्यांना आवडतात तर काही आवडत नाही.पण काही व्हीडीओ असे असतात की ते पाहून समाजातील उच्चशिक्षित लोकांची मानसिकता अश्या स्तराला का जाते असा प्रश्न पडतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक महिला एका पुरुषाला कार्यालयात घुसून चपलेने मारहाण करत आहे. ती त्यावर शांत होत नाही तर स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरुष कार्यालयाबाहेर धाव घेतो. महिला त्याचा पाठलाग करत रस्त्यावर पोहचते आणि भररस्त्यात त्याला चपलेने चोप देते.
सोशल मीडियावर एका महिलेचा कार्यालयात घुसून पुरुषाला मारहाण करण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे,. ही महिला सरळ कार्यालयात घुसून खुर्चीवर बसून असलेल्या पुरुषाला मारहाण करत आहे. कार्यालयातील कर्मचारी हा प्रकार स्तब्ध होऊन पाहत आहेत.कारण ही महिला कोण आहे ? आणि ती आपल्या साहेबांना का मारहाण करत आहे ? हे काहीच समजत नाही. महिला इतक्या रागात असते की ती कोणाचे काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते.
अधिकारी अचानक झुकेक्या या हल्ल्याने चकित होतो. आणि घाबरलेल्या अवस्थेत कार्यालया बाहेर पळत सुटतो. पण त्या महिलेचा राग काही केल्या कमी होत नाही ती त्याचा पाठलाग करत रस्त्यावर येते आणि त्याला पुन्हा चपलेने चोप देते. नंतर समजते की ती त्याची पत्नी आहे. आणि ती मागील एक वर्षांपासून माहेरी मुलाबाळांना घेऊन राहत आहे. तिच्या या पतीचे कार्यालयातील कुठल्या तरी महिलेशी अनैतिक सबमध आहेत आणि तो सगळा पगार तिच्यावर खर्च करतो. पत्नी आणि मुलाबाळांना काही देत नाही. मी।मुलाबळांचा सांभाळ कसा करावा असा प्रश्न ती उपस्थितांना विचारते.
दरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला. यक व्हिडिओत त्या अधिकाऱ्यांची मुलगी देखील वडिलांचे कार्यालयातील महिलेशी अनैति संबंध असून ते कुटुंबासाठी काहीच करत नसल्याचे म्हणते.