पुन्हा एकदा बच्चु कडू ने लगावली अधिकाऱ्याच्या कानशिलात
छत्रपती संभाजीनगर / नवप्रहार डेस्क
बच्चु कडू आणि अधिकाऱ्यात वाद हा काही नवीन विषय नाही. गाव पातळीवरून ते मंत्रालया पर्यंतचा टप्पा या वादाने गाठला आहे. वेळप्रसंगी त्यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात देखील लगावली आहे. ( आम्ही त्याचे समर्थन करत नाही.) छत्रपती संभाजीनगर येथे दौऱ्यावर असताना त्यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे.
दिव्यांगाना दिलेले वाहन खराब असल्याने बच्चू कडू चांगलेच संतापले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना तिथेच कानशिलात लगावली. छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊस मध्ये हा सर्व प्रकार घडला. बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना कानशिलात लगावल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बच्चू कडू वादात अडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही बच्चू कडू यांनी अनेकदा कानशिलात लगवल्याचा प्रकार घडला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये बच्चू कडू आणि मंत्रालयातील राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक पी प्रदीप यांची बाचाबाची झाली होती. बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टेबलावरील लॅपटॉप उगारला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांगाना निकृष्ट दर्जाचे ई रिक्षा वाटप करणार्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींनर बच्चू कडू चांगलेच संतापले होते. याविषयी विचारणा करताना त्यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट त्या प्रतिनिधीवर हात उगारला. दिव्यांग वित्त महामंडळाकडून मागील महिन्यात झालेल्या ई रिक्षा अतिशय निकृष्ट दर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या ई रिक्षाच्या अपघात व नियंत्रण गेल्याच्या तसेच बैटरी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. याकरीता दिव्यांग वित्त महामंडळाचे अधिकारी व कंत्राटदार कंपनीस संभाजीनगर येथे लाभार्थी सक्षम रिक्षाची चाचणी घेण्यात आली.
जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी त्याला केला आणि या वेळेस उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी झापलं , जवळपास 500 रिक्षांचे वाटप करण्यात आलंय, पैकी 250 ते 300 रिक्षा या खराब असल्याचं बच्चू कडू यांचे म्हणणं आहे, कानाशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता असे कडू म्हणाले, या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात, असं कडू यांनी सांगितले, दरम्यान राज्य सरकार याबाबत चौकशी करेल असे दिव्यांग विभागाचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.