क्राइम

पत्नीची हत्या करून मुंडके धडावेगळे करून  ते घेऊन पोहचला ठाण्यात 

Spread the love

पत्नीच्या अजब वागण्याने होता कंटाळला 

कर्नाटक /. नवप्रहार ब्युरो

                    कर्नाटक मधून एक भयानक घटना उघड झालीं आहे. या राज्यातील चंदपुरा येथील हीलालागे येथे ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने आपल्या पत्नीची हत्या करून मुंडके धडावेगळे केले. आणि ते मुंडके हातात घेऊन तो पोलिस ठाण्यात पोहचला. त्याला त्या अवस्थेत पाहून पोलिस देखील चक्रावले.

पोलीस स्टेशनमध्ये हे दृश्य पाहून सगळेच हादरले. एवढंच नव्हे तर पोलिसांच्याही अंगावर शहारा आला. पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असण्यावरुन वाद होत असल्याचे सांगितले. हा वाद शुक्रवारी इतका विकोपाला गेला की, पतीने रागाच्या भरात एवढं मोठं पाऊल उचललं आणि पत्नीच मुंडक धडापासून वेगळं केलं आहे.

ही घटना अनेकल तालुक्याजवळील चंदपुरामधील हीलालीगे गावात घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शंकर 26 वर्षीय पत्नी मनसाच्या विवाहबाह्य संबंधावरुन कंटाळला होता. याच रागाने त्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीपासून शंकर आणि मानसी यांचा लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. या दोघांना चार वर्षांची मुलगी आहे. दोघंही एका खासगी कंपनीत काम करत आहेत.

प्रेमसंबंधांनंतर केलं लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर आणि मानसा यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न केलं. हे कपल काही दिवसांपूर्वीच हीलालीगेमध्ये भाडेतत्वावर राहायला आले. 3 जून रोजी रात्री शंकर कामावरुन घरी निघाला आणि मानसाला जाताना सांगितलं की, तो उद्या सकाळी परत येईल. पण काम लवकर संपवून तो लवकर परतला आणि त्याचवेळी मानसा परपुरुषासोबत आपत्तिजन्य स्थितीमध्ये होती.

चौकशी दरम्यान शंकरने पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच त्याच्या लक्षात आलं की, आपल्या पत्नीचे परपुरुषासोबत संबंध आहेत. या मुद्यावरुन त्या दोघांमध्ये अनेक वाद देखील झाले. ज्यानंतर मानसा घरी निघून गेली. शुक्रवारी रात्री ८ वाजता घरी आली. पुन्हा या दोघांमध्ये त्याच मुद्द्यावरुन वाद सुरु झाला. ज्यामुळे शंकरला आणखी राग आला.

शंकरचा राग इतका अनावर झाला की, मानसाचं मुंडक झाटून टाकलं. त्यानंतर तिचं झाटलेलं मुंडक स्कूटरवर घेऊन स्वतः सूर्यनगर पोलिस ठाण्यात पोहोचला. जेथे त्याने आत्मसमर्पण केलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close