कार मध्ये रोमान्स करत होते पत्नी आणि प्रेमी, पतीने पाहिले आणि रस्त्यातच झाला हाय होलटेज ड्रामा
मुंबई / नवप्रहार डेस्क
मागील काही काळात विवाहबाह्य संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्राईम वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी सुद्धा वाढली आहे. मानसोपचार तज्ञांच्या मते यामागे विविध कारणे आहेत. विवाहबाह्य संबंध पतीचे असो वा पत्नीचे यात कुटुंब उध्वस्त होणे हे लागलेलेच आहे. पती ने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला कार मध्ये रोमान्स करताना पाहिले आणि रस्त्यातच सुरू झाला होलटेज ड्रामा .
बंद कारमध्ये पत्नी तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. पत्नीच्या प्रियकराने तिच्या पतीला मारहाण केली. प्रकरण पोलिसांत पोहोचल्याने याबाबतचा तपास सुरू झाला आहे.
उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या एका रेस्टॉरंटबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पती आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला जोरदार मारहाण करत होता. पतीने पत्नीला प्रियकरासोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर या तिघांमध्ये वाद सुरू झाला. मग प्रियकराने प्रेयसीच्या पतीला मारहाण केली आणि तो पळून गेला. पीडित पतीने पोलिसांत दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आशियाना इथल्या एका रेस्टॉरंटच्या बाहेर ही घटना घडली. या ठिकाणी कारमध्ये पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत बसल्याचं तिच्या पतीने पाहिलं. पतीने विरोध केला असता महिलेच्या बॉयफ्रेंडने तिच्या पतीवर हल्ला केला. प्रियकराने महिलेच्या पतीला मारहाण करून धक्का दिला आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
गोल्फ सिटी इथल्या सुशांत नावाच्या युवकाने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी तो आशियाना इथे कामानिमित्त गेला होता. तेथून परतत असताना स्पायसी हब रेस्टॉरंटच्या जवळ पोहोचताच त्याला त्याच्या पत्नीची कार तिथे उभी दिसली. त्याला संशय आला. तो कारजवळ गेला; पण कारमधलं दृश्य पाहून त्याला जबर धक्का बसला. कारमध्ये त्याची पत्नी तिचा प्रियकर आदित्य उपाध्यायसोबत बसली होती. प्रियकरासोबत पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पाहून पती संतापला आणि त्याने कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
बराच वेळ भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. वाद वाढताच कारमध्ये बसलेला आदित्य उपाध्याय कारचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला; पण तरुणाने विरोध करताच आदित्यने त्याला मारहाण केली आणि त्याला धक्का देऊन फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.