अजब गजब

पत्नीने पतीच्या जीभेचा चावा घेत ती गिळली

Spread the love

बिहार / नवप्रहार ब्युरो

              पती पत्नीत वाद हा काही नवीन विषय नाही. तो संसारातील एक भाग  होता आणि आहे. फारच संताप आल्यावर पती पत्नी एकमेकांना मारहाण करतात इथपर्यंत ठीक. कधी हा विषय खून, हत्या यापर्यंत देखील पोहचतो. पण वादात पतीची जीभ चावून ती गिळल्याची अजब गजब घटना बिहार राज्यात घडली आहे. यामुळे हसावं की रडावं असा प्रश्न पडला आहे.

 बिहारमधील पती-पत्नीच्या वादातच पत्नीने पतीच्या जीभेचा चावा घेत ती गिळल्याची अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

गया जिल्ह्यातील खिजरसराय पोलीस ठाणे परिसरातील ही धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. या घडलेल्या घटनेनं एकच खळबळ माजली असून पीडित पती अत्यंत भयग्रस्त झाला आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादामुळे पत्नीनेच आपल्या पतीच्या जीभेचा चावा घेतला आणि ती गिळून टाकली.

ही घटना घडल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जखमी झालेल्या पतीला घेऊन एका नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. तेव्हाच पती-पत्नींच्यात काही क्षुल्लक कारणावरून वाद उफाळला आमि ही घटना घडली, अशी माहिती समोर येत आहे.

संबंधित प्रकरणात ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीतील वादादरम्यान, पत्नीने अचानकपणे तिच्या पतीची जीभ चावा घेतला गेल्याचा आरोप करण्यात आला. घटनेला आता 24 तास उलटून गेले असूनही पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल झालेली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close