विकेट कुलदीपला पण चर्चा मात्र ध्रुव जुरेल ची
धर्मशाळा / क्रीडा प्रतिनिधी
इंग्लंड आणि भारत यांच्यात पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळल्या जात आहे. हा सामना जिंकून भारत 4 -1 अशी लीड घेऊन की मालिका संपवण्याचा तयारीत आहे. तर पहिलेच मालिका गमावलेला इंग्लंड पराजयचे अंतर कमी करून मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न करणार यात शंका नाही. आज सुरु झालेल्या अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंड चा कर्णधार बेन स्टोकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कुलदीप यादवणे ऑली पोप ला जुरेल करवी यष्टीचीत केले. पोप ला यादव ने बाद केले असले तरी चर्चा मात्र जुरेलची होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना झॅक क्रॉऊली आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात करुन दिली आणि पहिल्या विकेटसाठी ६४ धावा जोडल्या. त्यानंतर कुलदीप यादवने ऑली पोपला यष्टिचित केले. पण पोपच्या या विकेटमध्ये कुलदीपपेक्षा यष्टिरक्षक ध्रुव जुरेलची भूमिका जास्त महत्त्वाची होती.
ध्रुव जुरेलने मिळवून दिली ऑली पोपची विकेट –
कुलदीप यादवने एमएस धोनीच्या कार्यकाळात पदार्पण केले होते. त्यावेळी विकेटच्या मागून माहीभाईची साथ मिळायची, असे तो अनेकदा म्हणायचा. धोनी निवृत्त झाल्यावर अचानक कुलदीपचा गोलंदाजीचा आलेख घसरला. मात्र, गेल्या एक-दोन वर्षांत त्याने पुनरागमन केले आहे. आता ज्याप्रकारे त्याने ध्रुव जुरेलच्या मदतीने ऑली पोपला यष्टीचित केले. त्यावरुन धोनीची आठवण करून दिली. ध्रुव जुरेल य्ष्टीच्या मागून धोनीप्रमाणे मार्गदर्शन करताना विकेट बॉलच्या अगदी आधी कुलदीपला म्हणाला, ‘हा पुढे येणार…’ यानंतर लगेच कुलदीपने गुगली चेंडू टाकला आणि जुरेलने पटकन बेल्स उडवल्या.
कुलदीप यादवने दोन्ही विकेट घेतल्या –
या डावात सुरुवातीला भारतीय संघाचे गोलंदाज विकेट्ससाठी तळमळलेले दिसले. यानंतर कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. बेन डकेटनंतर त्याने ऑली पोपचीही विकेट घेतली. विशेष म्हणजे या सामन्यापूर्वी धर्मशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते, अशी चर्चा होती. अशा स्थितीत कुलदीप यादवला सोडून तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याची चर्चा होती. पण असे झाले असते, तर मोठी चूक झाली असती हे कुलदीपने दाखवून दिले.