चोरीच्या मोबाईल मध्ये सापडले असे काही त्याने सुरू केले ब्लॅकमेलिंग

मुंबई / नवप्रहार ब्यूरो
मोबाईल अशी वस्तू झाली आहे की त्यात तुमचे आणि कुटुंबाचे फोटो सह बँक खाते आजी इतर गोपनीय बाजी असतात. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर मोबाईल सह इतर नुकसान देखील होण्याची शक्यता असते. मोबाईल चोरीला गेला तर काय आणि किती भयानक होऊ शकते याची कल्पना न केलेलीच बरी. अशीच घटना एका व्यक्ती सोबत घडली. चोरीला गेलेल्या मोबाईल मध्ये नवरा बायकोचे खाजगी फोटो होते. चोरट्याने ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याला खंडणीची मागणी केली.
फूड डिलिव्हरी अॅपसाठी काम करणाऱ्या २५ वर्षीय व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला होता. त्यानंतर त्याला अज्ञात व्यक्तीने एक लाख रुपयांची मागणी केली. अजय यांच्या मोबाईलमध्ये पत्नीसोबतचे खासगी फोटो आणि व्हिडीओ होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करु, अशी धमकी देत चोराने एक लाख रुपयांची मागणी केली होती. अजय यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
२५ वर्षीय अजय हे एका फूड डिलिव्हरी ॲपवर काम करतात, त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 3 जुलै रोजी आरोपीने अजय यांचे पत्नीसोबतचे खासगी क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला फोन चोरला होता. त्यानंतर 26 जुलै रोजी आरोपीने अजय यांना फोन केला आणि एक लाख रुपयांची मागणी केली. एक लाख रुपये न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
नेमकं प्रकरण काय आहे, पोलिसांनी काय दिली माहिती ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हे गोरेगाव पूर्व येथे पत्नीसोबत राहतात. ते मागील पाच महिन्यांपासून फूड डिलिव्हरी ॲपवर काम करत आहेत. 3 जुलै रोजी ते अंधेरी पूर्व येथे फूड डिलिव्हरी देण्यासाठी जात होते, त्याचवेळी दुचाकीवर मोबाईल स्टँडवर असलेला मोबाईल चोरीला गेला.
त्यानंतर २६ जुलै रोजी अजय यांना एक फोन आला अन् खंडणीची मागणी केली. अहमद खान उर्फ नूर खान अशी फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं. आरोपीने अजय यांच्याकडे फोनमधील मेमरी कार्ड असल्याचे सांगितले, ज्यात त्याचे आणि त्याच्या पत्नीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ असल्याचेही सांगण्यात आले. ते ते नष्ट करण्यासाठी ₹ 1 लाख रुपयांची मागणी केली. रक्कम न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली.
आरोपीचा दुसरा फोन अन्….
अजय यांना 30 जुलै रोजी दुसरा फोन आला आणि सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला येथील बारमध्ये त्यांची भेट घेतली. आरोपी आणि अजय यांची भेट झाली. आरोपीने फोटो आणि व्हिडीओ मित्राला फॉरवर्ड केल्याचं त्यांना दिसलं. आरोपी खान यानं सांगितले की एक लाख रुपये दिले नाही तर खासगी-व्हिडीओ आणि फोटो दोन लाख रुपयांना विकणार अन् ऑनलाईन पोस्टही करेल. खानची धमकी ऐकून अजय घाबरले, त्यांनी एक लाख रुपये देण्याचं कबूल केले. पण रोख रक्कम उभी करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मागितल्याचं तक्रारीत सांगितले.
पोलिसांकडून आरोपीचा शोध –
अजय यांच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भादवि ३०८ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणाची कसून चौकशी कऱण्यात येत आहे. अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात ये आहे. बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्या येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.