काय तिला ‘ हम भी किसी से कम नहीं ‘ हे तर सिद्ध करायचे नव्हते ?
20 कोटीच्या खंडणीची मागणी :1 कोटी रुपये घेतले
नाशिक / नवप्रहार मीडिया
बिजगुणन केंद्रात कृषी सहायक असलेली महिला आणि तिच्या मुलाला स्वामी समर्थ केंद्राच्या विश्वस्त मंडळात असलेल्या ऐका कार्यकारी सदस्या कडून 1 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे.
पूर्वी महिला चूल आणि मूल यातच गुरफटल्या असायच्या. पण जस जश्या त्या शिक्षित होत गेल्या आणि समाजात त्यांना वावरण्याची संधी मिळाली. सोबतच आरक्षण आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची मुभा मिळाली त्यानंतर महिलांचे अच्छे दीन आले. प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या नावाचा डंका वाजवू लागल्या. पूर्वी गुन्हेगारी क्षेत्रात हसीना पारकर सारख्या एखाद दुसऱ्या महिला असायच्या. पण आता तर महिला सुध्दा पुरूषां सारख्या खंडणी सारख्या गुन्ह्यात सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कायदे महिलांच्या बाजूने असल्याने कदाचित महिला मंडळी पैकी काही त्याचा दुरुपयोग करीत असतील
याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली असून संशयित महिला सारिका सोनवणे हिच्या घर झडतीत पोलिसांना सोमवारी (दि.२०) आणखी १९ लाख रूपयांची रोकड हाती लागल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, तिचा मोबाइल डेटाचेही तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. आक्षेपार्ह तो व्हिडिओ फॉरेन्सिक’च्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याचे सांगून वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करून सुमारे १ कोटी रुपयांची खंडणी संशयित मायलेकांनी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित महिला कृषी सहायक सारिका बापूराव सोनवणे (४२), मोहित बापूराव सोनवणे (२५) या दोघांना अटक केली आहे. येत्या बुधवारपर्यंत (दि.२२) जिल्हा व सत्र न्यायालयाने या मायलेकाला पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीत या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. गुन्ह्याचा प्रकार व गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्याकडून मिळणारी माहितीच्याअधारे पोलिस तपासाला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांच्या आर्थिक व्यवहारांची छाननीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. ज्या आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओचा आधारघेत संशयित महिला व तिच्या मुलाने धमकावून सुमारे १ कोटी ५ लाखांची खंडणी वसूली केली, तो व्हिडिओ फॉरेन्सिककडे सखोल तपासाकरिता पोलिसांनी सोपविला आहे. संशयित महिलेच्या मोबाइलचा डेटाची पडताळणी पोलिस करत आहेत.