हटके

रस्त्याने चालतांना त्याने केले असे आणि झाला स्फोट 

Spread the love

व्हिडीओ व्हायरल लाखोंच्या घरात व्ह्यूज

          कधी कधी नकळत माणसाच्या हाताने अशी काही चूक होते की त्याचे काय परिणाम होतील याची त्याला कल्पना नसते. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.चला तर पाहू या असे काय आहे या व्हिडिओत.

अशाचप्रकारे एका व्यक्तीने रस्त्यावरून चालताना एक छोटीशी चूक केली आणि ती त्याच्या चांगलीच जीवावर बेतली, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याने चालताना दिसत आहे. चालता चालता तो अचानक एक ठिकाणी थांबतो आणि जमिनीवरील एका खड्ड्याकडे पाहत उभा राहतो. या खड्ड्याखाली कदाचित एक गटार आहे असे अंदाज आहे. यावेळी पुढच्याच क्षणी तो व्यक्ती त्याच्या हातातील सिगारेट गटारात फेकतो. अशाप्रकारे सिगारेट फेकण्याचे काय परिणाम होतील याची त्याला कल्पना नव्हती. या व्यक्तीने गटारात सिगारेट टाकताच पुढच्याच सेकंदाला एक भीषण स्फोट होतो. या स्फोटात व्यक्ती जोरात जमिनीवर कोसळतो, अशा परिस्थितीत सगळीकडे धूळ होते. ही धूळ कमी होताच तो व्यक्ती स्वत:ला सावरत उठवण्याचा प्रयत्न करतो आणि काहीवेळा तो यशस्वीपणे तिथून बाहेर पडतो.

 

 

हा व्हिडीओ @CCTV IDIOTS नावाच्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ सुमारे ३ लाख ७८ हजार युजर्सनी पाहिला असून ५ हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यक्तीच्या अशा वागण्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मी याला एक इशारा समजेन. दुसऱ्या युजरने लिहिले की, धूम्रपान धोकादायक आहे. तर तिसऱ्या युजरने लिहिले की, हा माणूस वेडा आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close