विशेष

लोक एन्जॉय करत असताना आली एक लाट अन् सगळच ……..

Spread the love

सुट्या आल्या की सुट्यांचा आनंद घेण्यासाठी लोक जास्तीत जास्त पर्यटन स्थळी जातात. त्यात जंगल सफारी, बीच, समुद्र किनारा अशी प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते. असेच काही लोक सुट्या आणि विकेंड चां आनंद घेण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गेले होते. सगळे एन्जॉय करत असताना नकळत समुद्रातून ऐक भली मोठी लाट आली अन् ……..

ब्राझीलच्या रिओ डी जनेरियोमध्ये एक समुद्रकिनारा आहे, ज्याचे नाव लेब्लॉन आहे. या समुद्रकिनाऱ्यावर लोक अनेकदा ये-जा करतात. तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळा समुद्रकिनाऱ्यावर मोठ मोठ्या लाटा उसळतात. कधी भरती तर कधी अहोटी. नुकतीच लेबलॉन बीचवर अशीच एक घटना पाहायला मिळाली, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान झालं असं की, या बीचवर मोठ्या संख्येने लोक आले होते. समुद्रकिनारी सर्वजण खुर्च्यांवर बसले होते. काही लोक उभेही होते, तर काहीजण पाण्यात मजा करत होते. तेवढ्यात अचानक एक मोठी लाट वेगाने उसळते आणि समुद्रकिनाऱ्यावर येते.

या भल्याोठ्या लाटेनंतर काय झाले ते व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. लाट येताच समुद्रकिनारी उभी असलेली माणसे अक्षरश: पाण्यात वाहू लागली. खुर्च्यांवर बसलेल्या लोकांचाच नाही तर उभ्या असलेल्या लोकांचाही तोल गेला.. तेसुद्धा लाटेसह पाण्यात जाऊ लागले. ही लाट एवढी अचानक आली की लोकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता की जेव्हा समुद्रातून लाट येत होती तेव्हा किनाऱ्यावर उभा असलेला एक व्यक्ती एका लहान मुलीसोबत लाट येताना पाहत होता. मात्र, ही लाट इतकी घातक असेल याची त्याला कल्पनाही नव्हती. या लाटेने किनाऱ्यावरील सर्वांनाच आपल्यासोबत नेले. ही घटना ५ नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close