हटके

 वाचा कुठे अंत्यसंस्कारासाठी लाकडांची कमी पडत आहे

Spread the love

बिहार / युपी – नवप्रहार न्यूज नेटवर्क 

            कोरोना काळात प्रत्येक दिवशी मृतांचा आकडा इतका भयंकर होता की स्मशानात मृतदेह जाळायला जागा सापडत नव्हती. नेमकी तशीच परिस्थिती सध्या उत्तरप्रदेश आणि बिहार मध्ये उद्भवली आहे. पण त्यामागे कोरोना हे कारण नसून उष्णतेची लाट हे कारण असल्याचे समोर आले आहे. 

यामुळे स्मशानात अत्यंसस्कारासाठी लाकड कमी पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. उष्णाघातामुळे होणाऱ्या मृतांच्या आकडा वाढत असल्याने आरोग्य यंत्रेणेची झोप उडाली आहे. कोरोनना काळातही उत्तर प्रदेशात स्मशानभूमीबाहेर अत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग लागली होती. उत्तर प्रदेशातील सध्याची स्थिती पाहता कोरोना काळ आठवून नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे.

स्मशानभूमीबाहेर अत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग

गंगा नदी किनारे महुली घाटावर मोठ्या प्रमाणात मृतदेह अत्यसंस्कारासाठी आणले जातात. स्मशानभूमीबाहेर अत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग लागली आहे. येथे इतके मृतदेह अंत्यस्कारासाठी येत आहेत की अत्यंसस्कारासाठी लाकडं कमी पडत असल्याचे येथे काम करणारे कर्मचारी सांगत आहेत. अचानक येथे मोठ्या प्रमाणात मृतदेह अत्यसंस्कारासाठी येत असल्याने लाकडं अपुरी पडत आहेत. अत्यंसस्कारासाठी तातडीने लाकडं उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे स्मशानभूमी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. अशीच स्थिती उत्तर प्रदेशात देखील पहायाल मिळत आहेत.

उष्माघाताचा हाहाकार

बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्माघाताने हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेशातील स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. 19 जून रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. 600 हून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही देखील समोर आले होते. 3 दिवसातील ही आकडेवारी होती.

सरकारी रुग्णालयातील आकडेवारी उपलब्ध

बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारकडे फक्त सरकारी रुग्णालयात मृत झालेल्या तसेच दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारी आहे. खाजगी रुग्णालयातील तपशील समोर आलेला नाही. संपूर्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये देखील अशा प्रकारे रुग्ण दाखल झालेले असावेत अशी शंका देखील उपस्थित केली जात. दरम्यान, उष्माघातामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होणे शक्य नाही. यामुळे यामागे वेगळे कारण देकील असू शकते अशी शंका आरोग्य यंत्रणेने उपस्थित केली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.

आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यामुळे योगी सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी प्रशासन आणि अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close