विदेश

वाचा कुठे ड्रग बनवण्यासाठी केला जात आहे मृतदेहाचा उपयोग

Spread the love

सरकारने देशात जाहीर केली आणीबाणी 

दक्षिण अफ्रिका / नवप्रहार वृत्तसेवा 

                       अवैध आणि गैरकायदेशीर कामात गुंतलेले उलट डोक्याचे लोकं कधी काय करतील याचा नेम नसतो. दक्षिण आफ्रिकेच्या एका देशात ड्रग बनवण्यासाठी मृतदेहाचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी थडगे उकरलेल्या स्थितीत आढळून येत आहे.सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. सिएरा लिओन या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

सिएरा लिओनचे राष्ट्रपती ज्युलियस माडा बियो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रगचं नाव कुश असं आहे. देशातील कित्येक नागरिकांना या ड्रगचं व्यसन लागलं आहे. विशेष म्हणजे देशातील रुग्णालयांमध्ये असणारे 63 टक्के रुग्ण हे याच ड्रगचे व्यसनी आहेत; असंही बियो यांनी सांगितलं.

मृतदेहाच्या हाडांचा वापर

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कुश’ ड्रग्स  बनवण्यासाठी विविध पदार्थांचा वापर होतो. मात्र यातील मुख्य घटक हा चक्क मानवी हाडं आहेत. यामुळे हे ड्रग्ज बनवणारे लोक थडग्यांना उकरुन मृतदेहांची चोरी करत आहेत. यामुळे देशातील कित्येक दफनभूमींबाहेर पोलिसांचा पहारा ठेवावा लागत आहे.

हा अमली पदार्थ सुमारे सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा समोर आला होता. याचं सेवन करणारी व्यक्ती कित्येक तास नशेत राहते. मात्र यामुळे शरीराला सूज येण्यासह कित्येक दुष्परिणाम दिसून येतात. हे ड्रग आता सिएरा लिओनसाठी मोठी समस्या ठरत आहे. ड्रग बनवणाऱ्या कित्येक टोळ्यांनी आतापर्यंत हजारो थडग्यांमधून मृतदेह आणि सापळ्यांची चोरी केली आहे.

4000 टक्क्यांनी वाढले रुग्ण

सिएरा लिओन सायकॅट्रिक रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अब्दुल जल्लोह यांनी आणीबाणीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या ड्रगला लढा देण्यासाठी हे गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये या ड्रगचं सेवन करणाऱ्या कित्येक तरुणांचं ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं आहे. 2020 ते 2023 या काळात कुश संदर्भातील आजारांची लागण झालेल्या रुग्णांचं प्रमाण 4,000 टक्क्यांनी वाढलं आहे.

देशाच्या अस्तित्वासाठी लढाई

राष्ट्रपती ज्युलिअस यांनी कुश ड्रग्सविरोधातील लढाई ही देशाच्या अस्तित्वासाठी असणारी लढाई आहे असं म्हटलंय. या अमली पदार्थामुळे देशाचा मृत्यूदर वाढला आहे. याला लढा देण्यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. तसंच, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीडितांसाठी देखभाल आणि मदत केंद्र तयार केलं जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close