हटके

जे पोलीस, खबरी आणि अन्य कोणी करू शकले नाही ते श्वाना ने करून दाखवले. 

Spread the love

                  प्राण्यांना मनुष्या पेक्षा जास्त बुध्दी असते. त्यांना कुठल्याही संकटाची चाहूल मानावापूर्विच लागते असे म्हटल्या जाते. प्राण्यांमध्ये श्वान  हा अतिशय हुशार आणि प्रामाणिक प्राणी आहे असे म्हटल्या जाते. तो खरोखरच प्रामाणिक आहे हे ऐका श्र्वाना ने दाखवून दिले आहे.

          घटना मुंबईतील आहे. अंधेरी पूर्व येथील अशोक नगर भागात राहणारा ऐक 6 वर्षाचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळायला गेला होता. त्मात्र, तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र मुलाचा पत्ता लागला नाही. कुटुंबाने जवळच असलेल्या पवई पोलिसांशी संपर्क साधला. स्थानकात पोहोचून याबाबतची माहिती दिली.

पवई पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांचं पथक तयार करून शोध सुरू केला. झोपडपट्टी परिसर असल्याने परिसरात सीसीटीव्ही नव्हते, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पवई पोलीस तंत्रज्ञानाबरोबरच गुप्त माहिती देणारे आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तपास करत होते. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी तातडीने श्वान पथकाला पाचारण केलं आणि मुलाने दिवसभरात घातलेल्या टी-शर्टच्या वासाच्या आधारे शोध मोहीम सुरू केली.

पोलिसांचा स्निफर डॉग लिओला प्रथम मुलगा राहत असलेल्या घरी नेण्यात आलं. काही वेळाने लिओ पोलिसांना त्याठिकाणी घेऊन गेला, जिथे हा मुलगा होता. हा मुलगा आंबेडकर उद्यान, अशोक टॉवर परिसरात आढळून आला. सहा वर्षाच्या मुलाला या श्वानानं शोधून काढलं. मुंबई पोलिसांनी श्वानाची मदत घेत या 6 वर्षीय मुलाला सुखरूप कुटुंबियांपर्यंत पोहोचवलं आहे.

कुत्र्यांच्या निष्ठेची नेहमीच चर्चा होत असते. श्वान हा माणसाचा सर्वात खास मित्र असल्याचं अनेकदा म्हटलं जातं. आता याचंच हे आणखी एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. पवई परिसरातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाला एका श्वानाने शोधून काढलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close