अंजनगावात आज प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक आणि सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.श्याम मानव यांचे आज दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अंजनगाव शहरातील प्रभा मंगलम येथे जाहीर व्याख्यान होणार आहे. संभाजी ब्रिगेड आणि दास सामाजिक संघटनेच्या वतीने या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले असून “भारतीय लोकशाही समोरील आव्हाने” हा प्रा.श्याम मानव यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे माजी महासचिव मधुकर मेहेकरे उपस्थित राहणार आहे.तसेच दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंतभाऊ वानखडे, किस्मत अली हशमत अली, मीडिया वॉच चे संपादक प्रा.अविनाश दुधे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रा. श्याम मानव हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात “भारतीय लोकशाही समोरील आव्हाने” हा विषय घेऊन जनजागृती करत आहे.त्याच पार्श्वभूमीवर अंजनगावात सुद्धा त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड आणि दास संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.