हटके

निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी तो बनला महिला ; आता मागे चौकशीचा ससेमिरा 

Spread the love

जिंद ( हरयाणा ) / नवप्रहार मीडिया 

निवडणूक काळात Mostly अधिकाऱ्यांच्या ड्युटी लावल्या जातात. आणि त्यात कुठलीही हयगय न करता ती करणे सगळ्यांना बंधनकारक असते. पण काही लोक  ड्युटी टाळण्यासाठी अनेक क्लुप्त्या अवलंबतात. परंतु काही वेळा असा आगाऊ पणा अंगावर येतो. असाच आगाऊ पणा एका शिक्षकाला नडला आहे. ड्यूटी टाळण्यासाठी त्याने गरोदर महिलेचे वेष घेतले. पण आता त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

हरियाणाच्या जिंदमध्ये निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी एका पुरुष शिक्षकाने गर्भवती महिलेचा वेश धारण केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी व डीसी यांनीही शिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावून खडसावले. चौकशी समितीची स्थापन करण्यात आली आहे.

निवडणूक ड्युटीसाठी जिल्हा प्रशासनाने विभागांकडून कर्मचाऱ्यांची आकडेवारी मागवली होती. डहौला येथील शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाने जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या कर्मचाऱ्यांच्या आकडेवारीत पीजीटी हिंदी या पदावर कार्यरत सतीश कुमार ही गर्भवती महिला असल्याचे दाखवण्यात आले आहे.

यामुळे सतीश कुमार यांना कुठेही ड्युटी देण्यात आली नाही. ही बाब समजल्यानंतर डीसीने गुरुवारी पीजीटी सतीश कुमार, मुख्याध्यापक अनिल कुमार आणि शाळेतील संगणक ऑपरेटर मनजीत यांना बोलावून घेतले, त्यांची चौकशी केली. प्राचार्य यांनी सांगितले की, ही चूक ना त्यांच्या स्तरावर होती ना गटशिक्षणाधिकाऱ्यांची, ही चूक कोणी केली हे त्यांना माहीत नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close