वाचा काय बोलल्या सुप्रिया सुळे ; राऊत यांची कानउघाडणी
केंद्रीय मंत्र्यांवर सुद्धा केले भाष्य
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. पक्ष सोडून गेलेल्या लोकांवर आणि पक्षात असलेल्या लोकांवर परस्पर विरोधी लोक अक्षरशः गरळ ओकत आहेत. पण पवार कुटुंबाने पक्षापेक्षा वैयक्तिक नात्याला महत्व दिल्याचे दिसून येत आहे.एकिकडे खा.सुप्रियाताई सुळे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यावर सडकून टीका केली आहे. तर अजित पवार यांच्या विरोधात सामन्यातून टीका करणाऱ्या संजय राऊत यांची कान उघाडणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. याचवेळी त्यांनी अजितदादां वर सामनातून करण्यात आलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गॄहखाते निष्क्रिय असल्याने ही स्थिती उद्भवली असून गुन्हेगार निर्ढावले आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंच्या गळ्यातील चैन चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. देव त्यांना निरोगी, दिर्घायुष्य देवो, असे म्हणत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यावर हल्ला झाल्याचा उल्लेख केला आहे. “केंद्रीय मंत्र्यांचे नातेवाईक देखील राज्यात सुरक्षित नाहीत, हे उघड झाले आहे. केंद्रीय मंत्र्यांची ही स्थिती आहे.सुळे म्हणाल्या, आमचे राजकीय मतभेद आहेत. परंतु आमच्यात मनभेद नाही. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हा बाळबोध आहे तर आम्ही नेहमी नाती जपली आहेत. आज आमची नाती ही घराबाहेर देशात अनेक ठिकाणी तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाणसाहेबांचे संस्कार झाले आहे, पवार कुटुंबियांचे संस्कार आहे. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आणि बोलतो असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांचे नातेवाईक देखील राज्यात सुरक्षित नाहीत, हे उघड झाले आहे. मंत्र्यांची ही स्थिती आहे तर सर्वसामान्य जनतेची अवस्था काय असणार ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, कृपया आपण कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी, असेही सुळे यांनी फडणवीसांना आवाहन केले आहे.