दिव्याग लाभ निधी वाटपात घाटंजी नगर परिषद ठरली जिल्ह्यात पहीली
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
दि.11.5.2023 रोजी नगर परिषद कार्यलय घाटंजी येथे प्रशासक तथा मुख्यधिकारी श्री अमोल सुखदेव माळकर यांचे प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवाना पेन्शन व बेरोजगार भत्ता वाटप करण्यात आला. विशेष बाब म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 मधील लाभाच्या निधी वाटपामध्ये यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी नगरपरिषद ही या आर्थिक वर्षातील दिव्यांग लाभ वाटपामध्ये पहिली नगरपरिषद ठरली आहे.प्रति दिव्यांग लाभार्थी रु 2000 प्रमाणे व दिव्यांग विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रु.3600 प्रति विध्यार्थी प्रमाणे अशे ऐकून 505600 /रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले . आता पर्यंत घाटंजी नगर पालिकेने एकूण 29,67,284 /रु. निधी दिव्यांग बांधवांना वाटप केला आहे. तसेच यावर्षीच्या लाभामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र खातेधारक लाभार्थी संख्या 105,भारतीय स्टेट बँक लाभार्थी संख्या 110,YDCC बँक लाभार्थी संख्या 6 , विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक लाभार्थी संख्या 14 व UBI बँक लाभार्थी संख्या 1असे एकूण 236 दिव्यांग लाभार्थ्याना थेट बँक खात्यात लाभ देण्यात आला आहे. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख उपस्थिति पत्रकार प्रतिनिधी श्री संतोषभाऊ पोटपिल्लेवार,श्री अरुण कांबळे उपस्थित होते, तसेच दिव्यांग बांधव प्रतिनिधी जुबेरमिया देशमुख, दिलीप भट, उमेश चौरागडे, सतीश गजबे तसेच नगर परिषद पाणीपुरवठा अभियंता राजू घोडके, लेखापाल नितीन हतमोडे, लेखाधिकारी प्रवीण होतमोडे, कर निरीक्षक शंकर नेहारे, NULM समन्वयक सदानंद आडे, अक्षय वातीले व सर्व न. प.कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने जे लाभार्थी अजूनही नोंदणीकृत नाहीत त्यांनी नगर परिषद कार्यालयात आपली नाव नोंद करून घ्यावी असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी घाटंजी यांणी केले आले.