सामाजिक

जिल्हास्तरीय आदिवासी मेळावा सोमवारी

Spread the love

गडचिरोली, / प्रतिनिधी

: नागरिकांना वैभवशाली आदिवासी संस्कृतीचा वारसा कळावा, समाजबांधवांमधील ऐक्य अधिक वृद्धींगत व्हावे, या उद्देशाने जिल्हा गोटूल समिती गडचिरोली व आदिवासी विद्यार्थी संघाच्या संयुक्त वतीने आदिवासी देवी-देवतांची महापूजा, जिल्हास्तरीय आदिवासी मेळावा व आदिवासी संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन २३ व २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीची झलक दिसणार आहे, अशी माहिती या भव्य कार्यक्रमाचे आयोजक आमदार डॉ. देवराव होळी, आविसंचे सरसेनापती तथा गोटुल समितीचे अध्यक्ष नंदू नरोटे यांनी शनिवार (ता. २१) पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे या सोहळ्याला राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्याविषयी माहिती देताना आयोजक आमदार डॉ. देवराव होळी, आविसंचे नंदू नरोटे म्हणाले की, सोमवार (ता. २३) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि बांबू व्यवस्थापन यावर पहिले सत्र पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी आविसंचे सरसेनापती तथा गोटुल समितीचे अध्यक्ष नंदू नरोटे राहतील. आयोजक व सत्कारमूर्ती आमदार डॉ. देवराव होळी राहतील.सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार आनंदराव गेडाम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्ममवाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, आविसंचे सिरोंचा अध्यक्ष बानय्या जंगम आदी उपस्थित राहतील. मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्याम कोरेटी, प्रा. डॉ. नरेश मडावी, डॉ. नरेशचंद्र काठोळे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी मार्गदर्शन करणार आहेत. आदिवासी समाजातील देव पद्धती व देवता तसेच स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी नायकांचे योगदान यावर नागपूर विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्याम कोरेटी मार्गदर्शन करणार आहेत.आदिवासी संस्कृतीवर आधारीत सांस्कृतिक स्पर्धा रात्री ७ वाजता धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन लाॅन येथे होणार आहे.या सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत कोणालाही भाग घेता येणार आहे. मात्र, आदिवासी संस्कृतीवरच आधारीत कला सादर करावी लागेल. यावेळी उद्घाटक म्हणून आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे, सहउद्घाटक म्हणून आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन नागपुरचे कार्याध्यक्ष माधव गावळ उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅंक आॅफ महाराष्ट्रच्या साकोली शाखेचे व्यवस्थापक कुंदन वलके राहतील. मंगळवार (ता. २४) सकाळी ११ वाजता चांदाळा रोडवरील गोटूल भूमीवर आदिवासी देवी-देवतांची महापूजा करण्यात येणार आहे. यावेळी उद्घाटक खासदार अशोक नेते, सहउद्घाटक देवरी विधानसभेचे माजी आमदार संजय पुराम राहतील. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा राहतील.या सोहळ्यात आदिवासी संस्कृतीवर आधारीत विविध देखावे राहणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गडचिरोलीत आगमन होताच स्थानिक इंदिरा गांधी चौकात त्यांचे आदिवासी संस्कृतीनुसार पारंपरिक वाद्यांच्या सुरात स्वागत करण्यात येईल. आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थि राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी, आविसंचे नंदू नरोटे यांनी पत्रकार परीषदेत केले.
——————————–

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close