बँक मॅनेजर हत्याकांड : हे आहे त्या मागील कारण.
आग्रा / नवप्रहारं मीडिया
बँक मॅनेजर सचिन उपाध्याय हत्याकांडात नवीन खुलासा झाला आहे. पोलिसांना हत्येमागील कारण शोधून काढण्यात यश आले आहे. सचिन हा भावाला पेट्रोल पंप घेऊन देणार होता आणि ही गोष्ट त्याने पत्नी पासून लपवून ठेवली होती. याच गोष्टीवरून दोघात वाद होत होता. पत्नी चे सचिन क्या कुटुंबीयांशी देखील फारसे पटत नव्हते. याच वादातून साची. ची हत्या करण्यात आली.
पती-पत्नीचा वाद इतका टोकाला गेला की, त्या वादातूनच बँक मॅनेजर असणाऱ्या सचिन उपाध्याय यांची वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली. सचिनच्या पत्नीने ज्या प्रकारे शांत डोक्याने सचिनची हत्या केली ती साऱ्यांनाच धक्का देणारी होती. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात काही गोष्टींचा उलघडा होतो आहे.
आपल्या पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह खोलीत बंद करुन ठेवण्यात आला होता. त्यानंतर प्रियांकाने मोलकरणी आल्यानंतर तिला कढी-भात आणि 16 चपात्याही करायला सांगितल्या होत्या. कारण घरात हत्या झाली याचा कोणालाही संशय येऊ नये यासाठी ती हे नाटक करत होती.
प्रियांका एवढ्यावरच थांबली नाही तर शेजारा राहणाऱ्या कुटुंबाकडचा मोबाईल घेऊन तिने आपल्या वडिलांना फोन केला. जे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्या बिजेंद्र सिंह रावत यांना फोन करुन सांगितले की, सचिन यांची तब्बेत बिघडली आहे. त्यामुळे तुम्ही कृष्णाला पाठवून द्या असंही तिनं वडिलांना सांगितले. त्यामुळे या हत्या प्रकरणात आता बिजेंद्र सिंह रावत हेही सहआरोपी आहेत. त्यामुळे या दोघांना अटक झाल्यानंतरच त्या दोघांमधील नेमका संवाद काय झाला होता हे कळणार आहे.
पोलिसांनी प्रियांकाला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र ती अजूनही पोलिसांसमोर आली नाही. तिच्या बरोबरच तिचे आई-वडीलही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांना समजले की, सचिन उपाध्याय यांची 21 ऑक्टोबरच्या रात्री हत्या झाली होती. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाली होती. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांना सचिन उपाध्याय यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती हे स्पष्ट झाले होते.
तर सचिनच्या शरीरावर गरम धातूने त्याला भाजल्याच्याही खुणा आहेत. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर 17 तास मृतदेह खोलीत लपवून ठेवण्यात आला होता. त्यानंतर पुरावेही नष्ट करण्यात आले आहेत. पोलिसांनी कॉलनीत चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरी मुन्नी आणि रजनी नावाच्या दोन मोलकरणी कामाला येत होत्या एवढीच माहिती कॉलनीतील रहिवाशांनी सांगितले होते.
सचिन उपाध्याय यांची हत्या करूनही प्रियांकाने मृतदेह लपवून ठेवून तिने मोलकरणीला 16 चपात्याही बनवल्या सांगितल्या होत्या. कारण पाहुणे आल्यानंतर जेवण बनवता येणार नाही म्हणून तिने आधीच जेवणाची व्यवस्था करुन ठेवली होती. त्यामुळे आता पोलिसांनी प्रियांकाबरोबरच या गुन्ह्यात आणि कोणाकोणाचा सहभाग आहे त्याचा तपासही पोलीस करत आहेत.