त्याच्या हिंमतीला सलाम ……!
तू घरी केव्हा येणार ? त्यावर तो म्हणाला आणखी दोन दिवसांचे काम शिल्लक आहे
पेहुगळी / नवप्रहार मीडिया
एकीकडे काही लोकं ज्यात लोकप्रतिनिधी , शासकीय कर्मचारी इतकेच काय तर कुटुंबातील एखादा अयदी व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून तोंड फिरवतो. पण हे देखील तितकेच खरे आहे की जो आपले कर्तव्य आणि जबाबदारी विसरतो तो कधीच प्रगती करू शकत नाही. जीवनात यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून जेव्हा आपण ऐकतो की त्यांनी हे यश व प्रसिध्दी मिळविण्यासाठी किती किती तास काम केलं.
ही झाली मोठ्या लोकांची गोष्ट पण एखादा साधारण व्यक्ती तो ही मजूर त्यातल्या त्यात जो नुकताच ऐका मोठ्या संकटातून याही पेक्षा सांगायचे झाल्यास तो मृत्यूच्या दाराला स्पर्श करून आला असेल आणि त्याला त्याच्या आईने तू घरी कधी येणार ? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर आणखी दोन दिवसांचे काम शिल्लक आहे, ते आटपून येतो ! तर अश्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच अभिमान वाटणे आवश्यक आहे. तर मग पाहूया हा विषय काय आहे.
उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात 2 आठवड्यांहून अधिक काळ अडकलेल्या 41 मजुरांची अखेर मंगळवारी सुखरूप सुटका करण्यात आली. रात्री आठच्या सुमारास या 41 मजुरांना एकामागून एक बाहेर काढण्यात आलं.ही बातमी ऐकून संपूर्ण देशाने सुटकेचा निःश्वास सोडला. याच अंधाऱ्या बोगद्यात अडकला होता जॉयदेब परमाणिक.
जॉयदेब हा हुगळीच्या पुरशुरा येथील निमडिंगीचा रहिवासी. बोगद्यातून बाहेर आल्या आल्या त्याने व्हिडिओ कॉलवरून आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला. एकमेकांना पाहून कुटुंबियांना आणि त्याला प्रचंड आनंद झाला. सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. मात्र तरीही आता जॉयदेबला पुन्हा घरी जायचं नाहीये. तर, तातडीने कामावर रुजू व्हायचंय. आपण आत अडकून पडल्यानंतर काम ठप्प झालं होतं, ते आता सुरळीत व्हायला हवं, अशी त्याची इच्छा आहे.
जॉयदेब बोगद्यात अडकल्याची माहिती मिळाल्यापासून त्याच्या कुटुंबियांच्या जीवात जीव नव्हता. त्याची आई तर दररोज मंदिरात जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करायची. आपला मुलगा सुखरूप घरी परतूदे, असं साकडं त्या देवाला घालायच्या. आता त्यांच्या मुलाचा कामाबाबतचा प्रामाणिकपणा पाहून तिथल्या लोकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.
जॉयदेबने बोगद्यातून बाहेर आल्यानंतर कुटुंबियांना फोन केला तेव्हा आईने ‘तू घरी कधी येणार?’, असं विचारताच ‘आता नाही, अजून दोन दिवसांचं काम बाकी आहे’, असं उत्तर त्याने दिलं होतं. दरम्यान, जॉयदेबवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. 17 दिवस बोगद्यात अडकल्यानंतर आता कधीच काम करू नये, अशी एखाद्या व्यक्तीची मनस्थिती होऊ शकते. परंतु जोयदेबने एवढे कठीण दिवस पाहूनही पुन्हा काम सुरू करण्यासाठी दाखवलेली तयारी खरोखर प्रशंसनीय आहे.