क्राइम

अपघाताचा केला बनाव पण पोलिसांपुढे लागला नाही टिकाव 

Spread the love

भडगाव/जळगाव- नवप्रहार मीडिया 

               नवरा – बायकोचे नाते हे विश्वासाचे नाते आहे. पण हल्ली विवाहबाह्य संबंध वाढल्याने नवरा बायकोत खटके ही नित्याची बाब झाली आहे. तर हीच लहान सहान भांडणे कधी भयंकर रूप घेतील आणि अनर्थ घडेल याचा काही नेम नसतो. लफडं असलेल्या बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आहे.

या प्रकरणातील पत्नीला अटक करण्यात आली आहे. किशोर शिवाजी पाटील वय ४५ रा. पाळासखेडे ता. भडगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील हे व्यक्ती आपल्या पत्नी पुष्पा पाटील हिच्या सोबत वास्तव्याला होते. दरम्यान किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी जि.पुणे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे अनेक वेळा या कारणावरून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते. दरम्यान, अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे पत्नी पुष्पा पाटील हिने ठरविले. त्यानुसार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने नियोजन केले. यात प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले. त्यानुसार किशोर पाटील हा शनिवार ३० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घरातून निघून गेला. त्यानुसार आगोदरच दबा धरून बसलेले राजेंद शेळके यांने अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला ठार केले. हा प्रकार रविवारी ३१ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह भडगाव पोलीस पथकाने धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलीसांनी पत्नी पुष्पा पाटील हिला ताब्यात घेतले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close