काय म्हणतो फलोदी सट्टा बाजार ; कोणाला मिळतील किती जागा
राजस्थान / नवप्रहार डेस्क
1 जून लां लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला। या निवडणुकीचा निकाल 4 जून ला येणार आहे. जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने हे जानण्यास उत्सुक आहेत. सट्टा बाजारात कोणाला किती जागा मिळणार या बद्दल अंदाज वर्तविण्यात येत आहेत. सट्टा बाजारात सर्वात विश्वसनीय समजल्या जाणाऱ्या फलोदी सट्टा बाजाराने आपला अंदाज वर्तविला आहे.
राजस्थानालातील फलोदी सट्टा बाजार देशात प्रसिध्द आहे. छोट्या-मोठा कारणांसाठी सट्टा लावला जातो. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी सुरू असून येथील बुकींची भविष्यवाणी आणि त्यांचा कल समोर आला आहे.
त्यानुसार भाजपसाठी उत्तर प्रदेशात चांगली बातमी नाही.
लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्याचे मतदान एक जूनला आहे. तर निकाल चार जूनला लागणार आहे. अखेरच्या टप्प्यातील मतदानाआधी फलोदी येथील सट्टा बाजारातील कल समोर आले आहेत. त्यानुसार भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा दावा केला जात आहे. भाजप प्रणित एनडीएला 304 ते 306 जागा मिळतील.
उत्तर प्रदेशातून मात्र भाजपसाठी चांगली बातमी नाही. या राज्यात भाजप 80 पैकी केवळ 55 ते 65 जागा जिंकू शकते. मागील निवडणुकीत भाजपला 62 जागा मिळाल्या होत्या. एवढ्या जागाही भाजपला मिळाल्या नाहीत, तर अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत प्रभाव टाकू शकला नाही, हे स्पष्ट होईल.
उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीच्या जागा वाढू शकतात, असा अंदाज सट्टा बाजारातून व्यक्त केल जात आहे. राज्यात आघाडीला 15 ते 25 जागा मिळू शकतात. मुंबईतील सट्टा बाजारातील बुकींनीही उत्तर प्रदेशात भाजपच्या जागांमध्ये वाढ होणार नसल्याचे अंदाज वर्तवले आहेत.
अंदाज चुकत नाहीत
फलोदी सट्टा बाजारातून समोर आलेले कल फारसे चुकत नसल्याचे अनेक समोर आले आहे. सट्टा लावणारे वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या, चर्चा, स्थानिक मुद्दे, प्रचारसभा, लोकांसोबत केलेली चर्चा आदी बाबी विचारात घेतात. त्यानुसार एक सामुहित मत तयार केले जाते. त्यानुसार विजय की पराभव यावर सट्टा लावला जातो.
मागील कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत फलोदी सट्टा बाजारात काँग्रेसच्या बाजूने कल होता. काँग्रेसला 137 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात काँग्रेसला 136 जागा मिळाल्या.
गुजरातमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, तर हिमाचल प्रदेशातील निवडणूक रंगतदार ठरेल, असा कल होता. त्यानुसार गुजरामध्ये भाजपची सत्ता आली आणि हिमाच प्रदेशात काँग्रेसने काटावर सत्ता मिळवली.