क्राइम

मध्यस्थी करायला गेला आणि खुनाचा आरोपी होऊन बसला 

Spread the love

नागपूर / नवप्रहार मीडिया 

                       एखाद्या गोष्टीवरून कधी कोणाचा पारा चढेल आणि त्याच्या हातून खजना सारखा प्रकार घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. आता मध्यस्थी करणे देखील वादाला तोंड फुटण्याचे कारण ठरू शकते हे नागपूरच्या साई नगर येथे घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे.

         पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार साई नगर येथील रहिवासी महेंद्र राम कोहले हे दुपारी मटण घेण्यासाठी मांसाच्या दुकानात गेले होते. तिथे त्यांना एक ओळखीचा माणूस भेटला. दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या आणि बोलता बोलता त्याचे रुपांतर वादात झाले. यावेळी दुकानात उपस्थित असलेल्या आशिक शेख बब्बू शेख रेहमान (22) याने कोहले आणि समोरच्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोहले यांनी रेहमानवर देखील राग काढला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे दुकानत उपस्थित असलेल्या रेहमानने त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर प्रकरण त्याच्यावरच उलटल्यानंतर तो संतापला आणि रागाच्या भरात त्याने मटन कापण्याच्या चाकूनेच ग्राहकावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर रागाच्या भरात रेहमानने दुकानातील मटन कापण्याच्या चाकू उचलून कोहले यांच्यावर सपासप वार केले. रेहमानने कोहलेच्या डोक्यावर, छातीवर आणि मानेवर वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये दहशत पसरली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर कोहले यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रेहमानला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 (हत्या) अंतर्गत अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close