बनावट कागदपत्रे वापरून विकली सिमकार्ड
विक्रेत्यान विरूध्द गुन्हे दाखल.
वरूड/तूषार अकर्ते
शेंदूरजनाघाट शहरातील आठवडी बाजार परिसरातील सिम कार्ड विक्रेत्यांनी दि.११ मे २०२३ या दिवशी एकाच फोटोचा वापर करून वेगवेगळे नाव व पत्ता असलेले फोटोचा व कागदपत्राचा वापर करून जास्त प्रमाणात सिम कार्ड चालू करून विक्री केली आहे. अशा प्रकारे बनावट कागदपत्राचा वापर करून त्यामध्ये वेगवेगळे व्यक्तीचे फोटो वापरून सिम कार्ड ऍक्टिव्ह करून स्वतःच्या फायद्यासाठी सिम कार्ड वितरित केले आहे.या प्रकरणावरून दि.७ जुलै रोज शुक्रवार ला दुपारच्या दरम्यान पोलिसांनी सिमकार्ड विक्रेत्यांवर विविध गुन्हे दाखल करून तपासात घेतले आहे.या मध्ये पॉस कोड ९९७०४२००१५ या नंबरवरील हरिष जनरल स्टोअर, पॉस कोड ९८९००५०४३२ या नंबरवरील प्रविण एस टी.डी. हनुमान मंदीरा जवळ,पॉस कोड ८६०००८२५०३ या नंबरवरील ओम मोबाईल सर्व आठवडीबाजार मलकापूर परिसरातील दुकानाच्या चौकशी अंती आरोपीचे नाव स्पष्ट होतील अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.