जय श्री राम च्या गर्जनात घाटंजीकर दंग

अयोध्या धर्तीवर घाटंजी मिरवणूकीत प्रभू श्रीराम मुर्ती साकारली
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
आज दी १७/०४/२०२४ रोजी चैत्र नवमी अर्थात रामनवमी निमीत्यने घाटंजी शहर राममय झाले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र प्रभुच्या भक्तांना यंदाची राम नवमी चे विशेष आकर्षन होते. अयोध्यात रामलला बिराजमान होउन भव्य राम मंदी उभारल्या गेल्यावर ही पहली रामनवमी शोभायात्रा असल्याने प्रभू रामचंद्राची आयोधेतील मुर्ती चीच प्रति कृती यंदा घाटंजी रामनवमी शोभायात्रेत साकारण्यात आली होती.सोबतच विवीध आकर्षक सजावट करत रामभक्त हनूमान, छत्रपती शिवाजी महाराज,अष्टधातूचा रामरथ ही मिरवणूकीत उपस्थितांचे लक्ष वेधत होता.जय श्री राम जय जय श्री राम,च्या गजरात विवीध ठोलपथक, डीजे च्या तालावर नाचत रामभक्तांनी अख्खा परिसर भक्ती मय झाला होता. पंचकोसीतून व बाहेगावून मिरवणूक पाहण्यासाठी येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठीकाणी महाप्रसादाचे व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रामभक्तांनी स्वयम स्फूर्तीने केली.मिरवणुकीत कुठली ही अनूचीत घटना घडू नये यासाठी घाटंजी पोलिस प्रशासन ने ही चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.