नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे अतोनात नुकसान
अनेक तक्रारी करूनही सा.बां.विभाग व कुषी विभागा कडून तक्रारीला केराची टोपली
मोर्शी / ओंकार काळे
शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढावे सिंचनाला पाणी मिळावे यासाठी शासनाने नाल्यावर बंधारे बांधून सोय केली आहे. पण बंधाऱ्याचे खोलीकरण नसल्याने नाल्याचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात जावून शेतकऱ्याचे पिकाचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिरखेड येथील शेतकरी नंदकिशोर मुंदडा यांचे शेत मौजा लाडकी(बु) शेत शिवारात येत असून नाल्याच्या पाण्याने या शेतकऱ्याचे सात एकर शेतातील सोयाबीन, तुर, कपासी या पिकांचे दरवर्षी अतोनात नुकसान होत आहे. आता दोन तीन दिवसापूर्वी पाऊस आला असता बंधाऱ्याचे खोलीकरण नसल्याने तसेच शिरखेड – लाडकी बु रस्त्यावरील पुल जमीन लेव्हल उंचीने कमी असल्यामुळे या शेतकऱ्याचे दरवर्षी नुकसान होत आहे. दरवर्षी शेतकरी स्वखर्चाने नाल्यावर, माती, मुरूम, दगड आणून बांध भरण्याचे काम करतो. याही वर्षी बांधावर सत्तर हजार रुपये खर्च केले असता त्याच्या काहीच उपयोग झाला नाही. या संबंधी शेतकऱ्याने संबंधित विभागाला दरवर्षी आजपर्यंत लेखी तक्रारी दिल्या पण संबंधित विभाग या कडे दुर्लक्ष करून तक्रार अर्जाला केराची टोपली समजून फेकून देत असल्याच दिसत. याच नाल्याला लागून मौजा खानपूर शिरखेड असून या मौजा मध्ये शिरखेड लाडकी बु येथील शेतकरी यांची जमीन असून या मौजा मध्ये शिरखेड लाडकी बु येथील शेतकरी बाबुराव पडोळे यांची शेती मौजा खानपूर शिरखेड शिवारात असून यांच्या शेताच्या काठावरून हाच मोठा नाला असून या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येत असून त्या नाल्याचे पाणी शेतात येत असल्यामुळे पिकाचे व शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत असते. याही वर्षी सुद्धा दोन वेळा पिकाचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग मोर्शी व कुषी विभाग मोर्शी यांना सहा वर्ष पासून सतत निवेदन देऊन पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी करून तसेच दरवर्षी नुकसान होत असल्याने जमीन लेव्हल पुलाच्या पायल्या कचऱ्याने, मातीने बुजल्या असल्याने शेताचे नुकसान होत असून कचरा व पायल्या मध्ये कचरा व माती काढून देण्याची विनंती सार्वजनिक विभागाला करत असतात पण याकडे सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मौजा खानपुर, मौजा लाडकी बु या शिवारातील अंदाजे 25 ते 30 शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यांना आज पर्यंतही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे शेतकरी सांगत आहे. मौजा खानपुर, हे शिवार शिरखेड मध्ये येत असून हे गाव तिवसा विधानसभा मतदारसंघात येत असून याचे प्रतिनिधित्व आमदार यशोमती ठाकूर करत आहे. तसेच मौजा लाडकी बु शिवार लाडकी बु मध्ये येत असून त्याचे प्रतिनिधित्व आमदार देवेंद्र भुयार करीत आहे. या लोकप्रतिनिधींचा शेतकऱ्यांच्या विषयी पुळका कुठे गेला? आता तर आमदार महोदय महिला मेळावा,आरोग्य शिबीर, दर्शन वारी, यात मग्न दिसून येत आहे. संबंधित विभागाला नाला खोलीकरण, पुलाची उंची वाढविण्याचा मुहूर्त मिळत नसून संबंधित विभाग शेतकऱ्यांच्या जीवावर उठला व बंधारा पुल वरदान तर नाही शाप ठरला. तसेच पुलावर नाल्याचे पाणी वाहत असतांना पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावर अनेक वेळा अपघात झाले असून काही वाहन धारक अपंग झालेले आहे नाल्यावरील बंधाऱ्यामुळे सिंचनाची सोय होईल शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊन शेतीतून येणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे स्वप्न शिरखेड तालुक्यातील लाडकी बु शिरखेड येथील मौजा खानपुर व लाडकी बु लगतच्या काही शेतकऱ्यांनी शेतातील सिंचनाच्या सुविधेचे बघितलेले स्वप्न आजही अधुरे आहे. शेतकऱ्यांचा पुळका येणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेलेत? असा शेतकऱ्यांनी प्रश्न करून लोकप्रतिनिधी विषयी संताप व्यक्त केला.
सदर नाल्याचे खोलीकरण नसल्याने नाल्याच्या पाण्याने नुकसान झाल्याची तक्रार संबंधित विभागाला दरवर्षी देऊन नुकसानीची आर्थिक मदत मिळाली नाही. पावसाळ्यातच नाल्याचे पाणी वाहून जाऊन शेतीला नदीचे स्वरूप येत असून त्यामुळे पिकाचे दरवर्षी नुकसान होत आहे या वर्षी सोयाबीन, तुर, कपासी पिकाचे माझे सहा ते सात लाख रुपयाचे नुकसान झाले याची नुकसानीची तक्रार विमा कंपनीला देऊन सुद्धा विमा कंपनीचा तसेच महसूल विभागाचा कुठलाही कर्मचारी नुकसान पाहायला आले नसून संबंधित विभागाने मोका पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच दरवर्षी या नाल्यामुळे होत असलेल्या पिकाचे, जमिनीचे नुकसान थांबविण्या करिता या नाल्याला दोन्ही कडून सिमेंट काँक्रिट ची स्वरक्षण भिंत बांधून देण्यात यावी नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा मला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेलं.
नंदकिशोर मुंदडा शेतकरी शिरखेड
शिरखेड लाडकी बु मौजा खानपूर रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी या संबंधी सा.बां. विभाग मोर्शी यांना सात वर्षापासून लेखी तक्रार देत आहोत. परंतु पुलाची उंची वाढविण्याचा मुहूर्त या विभागाला अजून पर्यंत मिळत नाही पुलाची उंची कमी असल्याने त्या पुलाच्या पायल्या मध्ये कचरा, माती अडकून बसल्याने या नाल्याचे पाणी माझे शेतात घुसून पिकाचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत आहे. याला जबाबदार सा.बां. विभाग आहे. तरी या पुलाची उंची वाढवून पीक नुकसानी ची मदत देण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व शेतकरी उपोषणाला बसू.
बाबुराव पडोळे शेतकरी लाडकी(बु.)