खेळ व क्रीडा

चुरशीच्या सामन्यात भारताचा विजय 

Spread the love

ओमान / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क 

                      इमर्जिंग आशिया कप २०२४ च्या पहिल्या सामन्यात भारतीय अ संघाने चुरशीच्या सामन्यात पाकिस्तान संघाचा ७ धावांनी पराजय करत विजयी सलामी दिली आहे.  हा सामना ओमानच्या अल अमिराती क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

भारत अ संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात ८ बाद १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ केवळ १७६ धावा करू शकला आणि ७ धावांनी सामना गमावला. पाकिस्तानला शेवटच्या षटकात पाकिस्तानला १७ धावांची गरज होती. पण अंशुल कंबोजने त्या होऊ दिल्या नाहीत.

भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारत अ संघाकडून अंशुल कंबोजने सर्वाधिक बळी घेत पाकिस्तान संघाच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पाकिस्तान लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा मोहम्मद हॅरिस आणि ओमर युसूफ ही सलामी जोडी केवळ २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अशा स्थितीत पाकिस्तानवर दबाव आला. पण यानंतर यासिर खान आणि कासिम अक्रम यांच्यात ५४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली.

अराफत मिन्हासने ४१ आणि अब्दुल समदनेही २५ धावा केल्या. अखेरीस, अब्बास आफ्रिदीने ९ चेंडूत १८ धावांची छोटी खेळी खेळली, पण शेवटी पाकिस्तान संघ विजयापासून ७ धावा दूर राहिला.

भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर अंशुल कंबोज सर्वात प्रभावी ठरला. त्याने ४ षटकात ३३ धावा देत ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय रसिक दार सलाम आणि निशांत सिंधूने २-२ बळी घेतले. आता भारत A चा पुढील सामना २१ ऑक्टोबर रोजी UAE विरुद्ध होईल. युएईने त्यांच्या पहिल्या सामन्यात ओमानचा ४ गडी राखून पराभव केला होता.

भारताचा डाव

पण तत्पूर्वी, भारत अ संघाचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी पहिल्या ५ षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले होते. अभिषेकने २२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावांची जलद खेळी खेळली.

तर दुसरा सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंगने ३६ आणि अभिषेक शर्माने ३५ धावा केल्या. अभिषेकने २२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. तर प्रभसिमरन सिंगने १९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारले.

मधल्या फळीत निहाल वढेराने २५ आणि रमणदीप सिंगनेने १७ धावांचे योगदान दिले. भारताकडून कर्णधार तिलक वर्मा याने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून गोलंदाजीत सुफियान मुकीमने सर्वाधिक २ बळी घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close