सामाजिक

त्रिमूर्ती चौक, भंडारा: बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक समितीच्या निवडणुकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार

Spread the love

भंडारा / प्रतिनिधी

:भंडारा जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाचा गौरव असणाऱ्या भंडारा येथील त्रिमूर्ती चौकातील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या देखभालीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भंडारा यांच्या निवडणुका 14 जुलै 2024 रोजी सर्व समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या अनुमतीने शासकीय नियमानुसार घेण्यात आल्या. ही निवडणूक सर्व सदस्यांच्या अनुमतीने गुप्त मतदानाद्वारे पार पडली.

या निवडणुकीत अध्यक्षपदी महादेव मेश्राम, सचिवपदी मदन बागडे, कोषाध्यक्षपदी महेंद्र वाहने, संघटक रमेश जांगळे, उपाध्यक्ष पदावर सुनील धारगावे, बी. सी. गजभिये, डी. एफ. कोचे, ऍड.डी. के. वानखेडे, इंदिरा सतदेवे, तर सहसचिवपदी टी. के. नंदागवळी, रवी भांडारकर, आणि निर्मला गोस्वामी यांची निवड करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान समारंभ दी. बँक वर्ड को.ऑप. हाऊससिंग सोसायटी, मैत्र्य ग्रुप वैशाली नगर, कौडल्य महिला संघटन, तथा भारतीय बौद्ध महासभा भंडारा जिल्हा यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भंडारा शहराचे माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता साहित्यिक कवी अमूर्त बन्सोड यांनी दिली होती.

कार्यक्रमात सर्व पदाधिकारी आणि सभासदांचा सामाजिक सत्कार करण्यात आला. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पी. डी. मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश जांगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद कान्हेकर, श्रीराम बोरकर, खोब्रागडे, एम. डब्लु. दहिवले, अनमोल देशपांडे, प्रा. ऋसेसरी, दिलीप चंद्रिकापुरे, दिलीप वाहने, कैलास गजभिये, उत्तम डोंगरे, ध्यानेश्वर गजभिये, मोरेश्वर गेडाम, कल्पना ढोके, स्वर्णलता दहिवले, रमा मेश्राम, विशाखा वाहने, मीना वाहने इत्यादी समाज कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भविष्यातील योजनांवर चर्चा केली आणि समाजाच्या उन्नतीसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली. समितीने समाजातील युवक आणि महिलांना प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे.

या सन्मान समारंभात उपस्थितांनी आपल्या विचारांचे आणि प्रेरणादायी अनुभवांचे आदानप्रदान केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजहिताच्या कार्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. भंडारा जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या या सन्मान समारंभाने एक नवा उन्मेष दिला असून, आगामी काळात समाजाच्या प्रगतीसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील याची खात्री दिली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close